
Laxman Hake News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले आहे. दोषारोप दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत प्रकृतीचे कारण देत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
'धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांना देखील सहआरोपी करा मात्र, पुरावे नसताना मीडिया ट्रायल करून कोणाला आरोपी करता येत नाही', असे लक्ष्मण हाके म्हणाले.
धनंजय मुडें यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती तेव्हा लक्ष्मण हाके यांनी त्यांना पाठींबा दिला होता. आत्ता आपल्या त्या भूमिकेवरून हाके यांनी यूटर्न घेतला. ते म्हणाले, देशमुखांना यांना ज्या पद्धतीने मारहाण आणि हत्या झाली. त्याचे फोटो जर आधी पाहायला मिळाले असते तर यापूर्वीच त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही मोठे आंदोलन केले असते.
संतोष देशमुख यांचा छळ करत हत्या करण्यात आली. त्याचे फोटो व्हिडिओ आत्ता समोर आले आहेत. जर याच्या विषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आधीच माहिती असेल तर त्यांनी आधीच राजीनामा घ्यायला हवा होता, असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले.
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्यावर बोलताना हमाम में सब नंगे होते है, असे म्हणत गोरे यांचा राजीनामा मागत असतील तर 288 आमदारात एकही आमदार राहू शकणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य हाके यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.