Lek Ladki Scheme : पालकांसाठी मोठी बातमी! राज्यातील लोकप्रिय योजनेच्या नियमात मोठा बदल; अदिती तटकरेंनी केली घोषणा

Maharashtra Government Lek Ladki Scheme : राज्य सरकारच्या 'लेक लाडकी' योजनेच्या अर्ज प्रक्रियेत बदल करण्यात आला असून याबाबतची घोषणा मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.
Aditi Tatkare announcement on Lek Ladki scheme
Aditi Tatkare announcement on Lek Ladki schemeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai Mews : राज्यातील मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावणाऱ्या लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यासोबतच नोंदणीपासून अर्जाची सद्यस्थिती तपासण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

मंत्री तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेक लाडकी योजनेअंतर्गत आतापर्यंत २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना पहिला लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास लाभार्थ्यांना गावातील अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर अंगणवाडी केंद्रातून अर्ज प्रकल्प स्तरावर पाठविले जात आणि संबंधित पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात असे. पुढे अर्जांची छाननी करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती.

मात्र, आता या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाच्या सूचनांनुसार लेक लाडकी योजनेसाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या टप्प्यांमध्येही सुसूत्रता आणण्यात आली आहे.

Aditi Tatkare announcement on Lek Ladki scheme
Aditi Tatkare : आदिती तटकरेंनी 'या' गाण्यावर धरला भन्नाट ठेका, घरातील उत्साही वातावरणाचा व्हिडिओ व्हायरल!

अंगणवडीत जाण्याची अट संपली

नव्या व्यवस्थेमुळे अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही. विशेषतः ज्या भागांत अंगणवाडी केंद्र कार्यान्वित नाही, तेथील लाभार्थ्यांना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यातील कोणत्याही क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून अर्ज करता येईल.

अर्जाची स्थितीही ऑनलाइन पाहता येणार

अर्जदारांना अर्ज सादर केल्यानंतर त्याची सद्यस्थिती ऑनलाइन तपासण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अर्जासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

Aditi Tatkare announcement on Lek Ladki scheme
Aditi Tatkare : 'लाडकी बहीण' योजनेतील १५०० रुपये केवळ खर्च करू नका; बचतीचीही सवय लावा : आदिती तटकरेंचा मोलाचा सल्ला

दरम्यान, लेक लाडकी योजनेतील लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. आता अर्ज प्रक्रियाही ऑनलाइन झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीत आणखी एक महत्त्वाचा बदल झाला आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यापासून ते अर्जाची स्थिती जाणून घेण्यापर्यंतची प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.