Congress News : काँग्रेसमध्ये रस्सीखेच; विधिमंडळाचे गटनेते कोण होणार?

Political News : सोळा आमदार असलेल्या काँग्रेसने अद्याप गटनेता निवडलेला नाही. यावरून काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे समजते.
Nana Patole Vijay Wadettiwar
Nana Patole Vijay Wadettiwarsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. विरोधीपक्ष नेता निवडण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळसुद्धा आघाडीतील एकाही पक्षाकडे नाही. विधानसभेत विरोधी बाकावर बसावे लागणार हे स्पष्ट होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आमदार भास्कर जाधव तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली. दुसरीकडे सोळा आमदार असलेल्या काँग्रेसने अद्याप गटनेता निवडलेला नाही. यावरून काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. (Congress News)

काँग्रेसचे (Congress) विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. निवडून आलेल्या सोळा आमदारांपैकी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नाना पटोले थोडक्यात वाचले. ईव्हीएममध्ये ते पराभूत झाले होते. मात्र टपाल मतांनी त्यांना तारले. अवघ्या २५० मतांच्या फरकाने ते निवडून आले आहेत. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसने निवडणूक लढली होती. त्यामुळे पराभवाचे खापरसुद्धा त्यांच्या फोडण्यात येत आहे.

Nana Patole Vijay Wadettiwar
CM Devendra Fadnavis : जुने मित्र, आता कट्टर प्रतिस्पर्धी! फडणवीस ठाकरेंच्या भेटीसाठी लास्ट टाईम 'मातोश्री'वर केव्हा गेले होते?

लोकसभेच्या निवडणुकीत नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले होते. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. राहूल गांधी यांच्याशी जवळीक आणि लोकसभेतील यशामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांची कोंडी झाली होती

Nana Patole Vijay Wadettiwar
Devendra Fadnavis Video : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस 'अ‍ॅक्शन मोड'वर, अधिकाऱ्यांना म्हणाले...

आता मात्र राजकीय परिस्थिती बदलली आहे. हे बघता अनुभव, आक्रमकता आणि विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव असलेले विजय वडेट्टीवार यांचे नाव काँग्रेसचे गटनेते म्हणून आघाडीवर असल्याचे समजते. अमित देशमुख यांचेही नाव एका गटाकडून रेटले जात असल्याचे वृत्त आहे.

Nana Patole Vijay Wadettiwar
Nana Patole : निमंत्रण दिले असते, तर शपथविधीला गेलो असतो; नाना पटोलेंची गुगली

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होती. दोन दिवसानंतर पटोले यांनी आपण राजीनामा दिल्याचा नकार दिला होता. काँग्रेसने अद्याप संघटनेत फेरबदल करण्याचे सुतोवाच केलेले नाही. पटोले यांनी गटनेता आणि काँग्रेसचा प्रतोद अधिवेशापूर्वी निवडला जाईल, असे सांगितले आहे. मात्र विशेष अधिवेशनापूर्वी की हिवाळी अधिवेशनापूर्वी हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

Nana Patole Vijay Wadettiwar
Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या मागणीमुळे लाडक्या बहि‍णींना आतापासूनच 2100 रुपये मिळणार, नेमकं काय म्हणाल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com