Maharashtra Phase 2 Elections Voting : नवरदेव, नवरी मतदान केंद्रात, वऱ्हाडी मात्र गायब; मतदानाची टक्केवारी घसरली !

Voting Drop : देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदारांमध्ये राजकीय नैराश्य आहे की, लग्नसराईत मतदार व्यस्त आहेत, असा प्रश्न उपस्थित होताे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत मतदाता वऱ्हाडी गेला तरी कुठे असा प्रश्न विचारला जात आहे.
Akola newly married couple voted
Akola newly married couple votedSarkarnama
Published on
Updated on

Phase 2 Elections Voting Maharashtra : दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरू आहे. पण, मतदाता मतदान केंद्रापासून लांब आहेत. यासाठी एकूण 16,589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते.

मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहता सर्वत्र आश्चर्य वाटत आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या आठ ही मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत घसरलेली टक्केवारी चिंताजनक आहे. तदानाची अंतिम टक्केवारी किती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola newly married couple voted
Lok Sabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीचा 'कंट्रोल' महिलांच्या हाती..?

अकोला लोकसभा मतदारसंघ Akola Lok Sabha Election 2024 Voting Live

अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वा. पर्यंत 42.69 टक्के मतदान झाले. दूपारी कुठल्याही मतदान केंद्रावर रांगा नव्हत्या मतदार मतदान करण्यास इच्छुक नसल्याचे चित्र होते. अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील तर भाजप युवा नेता अनुप धोत्रे यांच्यात थेट लढत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18,90,814 मतदार मतदान करणे अपेक्षित होते. पण, घसरणारी टक्केवारी पाहता अनपेक्षित निकाल लागण्याची चिन्हं आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघ Amravati Lok Sabha Election 2024 Voting Live

राजकीय वाद विवादानंतर अमरावती मतदारसंघात मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी वाढली नाही. अमरावती मतदारसंघात दुपारी 3 वा. पर्यंत 43.76 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप आमने सामने आहे. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे विरुद्ध भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यात थेट लढत आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत 18,36,078 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल.

वर्धा लोकसभा मतदारसंघ Wardha Lok Sabha Election 2024 Voting Live

वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उत्साह मात्र दिसत नव्हता. मतदानाची टक्केवारी पाहिल्यावर हा अनुत्साह का असा प्रश्न विचारला जात आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजप नेते रामदास तडस विरोधात राष्ट्रवादीचे अमर काळे यांच्या विरोधात लढत होत आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव उमेदवार अमर काळे आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीत 16,82,771 मतदारांपैकी किती मतदान करतात आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. वर्धा मतदारसंघात 2014 मध्ये 65 टक्के व 2019 मध्ये 62 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाच्या टक्केवारी घट होते की वाढ होते हे पाहण्यासारखे ठरेल. तर या लोकसभा मतदार संघात दूपारी 3 वा. 45.95 टक्के मतदान झाले.

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघ Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024 Voting Live

या ठिकाणी राजश्री पाटील या आयात उमेदवाराला शिवसेना (शिंदे गट) ने तिकीट दिले. या मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना अशीच लढत होत आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांनी येथे संजय देशमुख यांना उमेदवारी दिली. यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीत यंदा 19,40,916 मतदारांपैकी अनेकांनी मतदानाला दांडी मारल्याचे चित्र आहे. मतदार संघातील उमेदवार बदलामुळे मतदारांनी मतदान टाळल्याची चर्चा दोन्ही जिल्ह्यात आहे. आज दूपारी 3 वाजेपर्यंत 42.55 टक्के मतदान झाले.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ Buldhana Lok Sabha Election 2024 Voting Live

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17,82,700 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे ) नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होणार आहे, तर या ठिकाणी वंचित सह अपक्ष रविकांत तुपकर यांची भूमिका निर्णायक ठरेल. या मतदार संघात आज दूपारी 3 वाजेपर्यंत 41.66 टक्के मतदान झाले. मराठवाड्यातील दूपारी 3 पर्यंत हिंगोली मध्ये 40.50 टक्के मतदान , नांदेड 42.42 टक्के मतदान तर, परभणी मध्ये 44.49 टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

R

Akola newly married couple voted
Nanded Loksabha News : धक्कादायक! नांदेडमध्ये युवकाने ईव्हीएम मशीन फोडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com