Lok Sabha Election 2024 News : नवनीत राणा यांचा AIMIM बाबत मोठा दावा; म्हणाल्या यंदाच्या लोकसभेत...

Navneet Rana News : महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत.
Imtiaz Jaleel On Navneet Rana
Imtiaz Jaleel On Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Politcal News : लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग शनिवारी दुपारी करणार आहे. त्यापूर्वीच राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार, याबाबत विविध चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता यंदाच्या निवडणुकीत एमआयएम खातेदेखील उघडणार नसल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

युवा स्वाभिमान पार्टीच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपण कालही एनडीएत होतो, उद्याही एनडीएतच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात एनडीएकडून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024 News)

Imtiaz Jaleel On Navneet Rana
Shiv Sena MLA News : एकनाथ शिंदेंचे 12 आमदार 'मातोश्री'ला शरण जाणार? ठाकरेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा!

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात यंदा एमआयएमचे खाते उघडण्याची शक्यता कमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधून गेल्या निवडणुकीत एमआयएमने खाते उघडले होते. मात्र, या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महायुतीमधील मित्रपक्षांशी जागावाटपाची बोलणी जेथे सुरू आहे. त्या वादाच्या जागांची घोषणा अद्याप झालेली नाही. नवनीत राणा यांनी आता आमच्या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा आणि आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजप पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील ते पाळू, असे एकीकडे म्हणत आपली उमेदवारी कायम असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे या जागेवर महायुतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) किंवा अभिजित अडसूळ हेच शिवसेनेचे उमेदवार असतील, असा दावा या पिता-पुत्रांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात ही लोकसभेची जागा महायुतीच्या कोणत्या घटक पक्षाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

Imtiaz Jaleel On Navneet Rana
Navneet Rana Threat Call : नवनीत राणांना अफगणिस्तानातून जिवे मारण्याची धमकी?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com