Lok Sabha Election 2024 : पंकजाताई, कोल्हे, लंके, शशिकांत शिंदेंची धडधड वाढली; एक्झिट पोलचे अंदाज उलटे फिरणार?

Tension Increased of Pankaja Munde Nilesh Lanke Shashikant Shinde After Exit Poll Announcements : एक्झिट पोलमधील काही जागांवरील निकालाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
amol kolhe | nilesh lanke | shashikant shinde | pankaja munde
amol kolhe | nilesh lanke | shashikant shinde | pankaja mundesarkaranama
Published on
Updated on

Lok Sabha Exit Poll Results : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ( एनडीए ) निर्णायक कौल मिळेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तरी, महाराष्ट्रातील चित्र मात्र राष्ट्रीय पातळीवरील निकालाच्या विपरीत असेल, असा सूर एक्झिट पोलमध्ये आवळला आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांचा झंझावात आहे. तरी महाराष्ट्रात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मोदी आणि शाह यांचा निभाव लागणार नाही, असे अंदाज पुढे आले आहेत.

त्यामुळे भाजप नेत्यांवर आतापासून डोके खाजविण्याची वेळ ओढावली आहे. परंतु, एक्झिट पोलमधील काही जागांवरील निकालाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

त्यात शिरूर, सातारा, नगर, बीडमधील एक्झिट पोलचे चुकू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलमध्ये शिरूरमधून अमोल कोल्हे ( Amol Kolhe ), नगरमधमध्ये नीलेश लंके, साताऱ्यात शशिकांत शिंदे, बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचं दिसून येत होतेपण, एक्झिट पोलच्या अंदजानंतर शिरूरमधून कोल्हेंचा, साताऱ्यात शशिकांत शिंदे आणि नगरमध्ये नीलेश लंकेंचा पराभव होऊ शकतो. तर, बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पाडाव होऊ शकतो अशा राजकीय चर्चांनी राजकीय माहोल गरम झाला आहे.

परिणामी एक्झिट पोलनंतर काहीसा दिलासा मिळाळेल्या अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे, नीलेश लंकेंना मतमोजणी दिवशी शेवटच्या ईव्हीएमपर्यंत धाकधूक राहणार हे नक्की आहे. त्यातच बीडमधील ताई-बप्पांच्या म्हणजे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंच्या लढतीकडे पुन्हा सगळ्यांच्या नजरा लागून राहणार आहेत.

amol kolhe | nilesh lanke | shashikant shinde | pankaja munde
Sudhir Mungantiwar : ‘यह कहाॅं आ गया मैं...’ ; एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांचा डोक्याला हात!

एक्झिट पोलमध्ये काय अंदाज?

मतदारसंघ आघाडीवर पिछाडीवर

अहमदनगर - नीलेश लंके सुजय विखे-पाटील

बीड - पंकजा मुंडे बजरंग सोनवणे

शिरूर - अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव-पाटील

सातारा - शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले

amol kolhe | nilesh lanke | shashikant shinde | pankaja munde
Sudhir Mungantiwar : ‘यह कहाॅं आ गया मैं...’ ; एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांचा डोक्याला हात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com