Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत जागावाटपावरून नेमका ‘तिढा’ काय? आंबेडकरांनी सांगितलं कारण; म्हणाले...

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi : “...तो सुटेपर्यंत महाविकास आघाडी आमच्याशी बोलू शकत नाही,” असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
uddhav thackeray sharad pawar mallikarjun kharge prakash ambedkar
uddhav thackeray sharad pawar mallikarjun kharge prakash ambedkar sarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्यात जागावाटपाबाबत बैठका पार पडत आहेत. त्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी जागावाटप रखडण्याचं कारण सांगितलं आहे.

uddhav thackeray sharad pawar mallikarjun kharge prakash ambedkar
Sanjay Raut News : “आदित्य अन् रश्मी ठाकरे पंतप्रधानांना भेटले”, केसरकरांचा दावा अन् राऊतांनी दिलं आव्हान; म्हणाले...

मुंबईतील फोर सीझन हॉटेल येथे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले, “शिवसेना 22, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी 9 असं जागावाटप ठरल्याची माहिती मिळाली आहे. पण, त्यातील 15 जागांवर त्यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे वाद मिटत नाही, तोपर्यंत हे जागावाटप खरं असल्याचं मी मानत नाही.”

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

“ही महाविकास आघाडीची बैठक नाही, पण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि माझ्यात चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाबद्दल ते माहिती देणार आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप ठरलं नाही. त्याबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे. यात वंचितची भूमिका नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

uddhav thackeray sharad pawar mallikarjun kharge prakash ambedkar
Sanjay Raut on Amit Shah : "ठाकरेंना लाज वाटली पाहिजे," शाहांच्या या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं; म्हणाले...

“काँग्रेस आणि शिवसेनेत 10 जागांवरून चढाओढ सुरू आहे. पाच जागांवरून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये ठरणं बाकी आहे. एकंदरीत 15 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झालं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं जोपर्यंत ठरत नाही, तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. कारण 15 जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली, तर आम्ही कुणाबरोबर बोलायचं? त्यामुळे हा महाविकास आघाडीचा तिढा आहे. तो सुटेपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाहीत,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

R

uddhav thackeray sharad pawar mallikarjun kharge prakash ambedkar
Lok Sabha Election 2024 : शाहांची स्ट्रॅटेजी 'मॅजिक' घडवणार; महायुतीचा तिढा रात्रीत सुटणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com