Prakash Ambedkar : वंचितची भूमिका गुलदस्तात, प्रकाश आंबेडकर लवकरच अर्ज भरणार

Maharashtra Politics : वंचित नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबाबत आज आपली भूमिका जाहीर करणार होते, पण तूर्तास तसे शक्य नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सूतोवाच केले होते. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीसोबत वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे कायम राहतील की नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडी वंचितसाठी काँग्रेस अकोल्यात जागा सोडणार काय, यासह विविध प्रश्नांवर राज्यात आणि देशात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत आंबेडकर यांना सोबत घेण्याचा मोठा दबाव महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आहे. आंबेडकर हे सोबत असतील तर राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अनेक मतदारसंघांत बदलण्याची स्थिती आहे.

आज वंचित नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबाबत अंतिम सूतोवाच करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीबाबत आंबेडकर हे आज अंतिम निर्णय घेणार होते. पण, तूर्तास त्यावर निर्णय घेतला जाणार नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. असे असताना प्रकाश आंबेडकर लवकरच त्यांचा उमेदवारी अर्ज अकोला लोकसभा मतदारसंघातून दाखल करणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सूतोवाच केले होते. पण, आता आंबेडकर यांनी नवीन तारीख निश्चित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar
Satej Patil Kolhapur News : शेट्टींना काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध; कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांसमोर मांडली भूमिका

प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईत त्यांनी 27 मार्च रोजी अकोल्याचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे घोषित केले होते. पण, आता आंबेडकर यांनी नवी तारीख घोषित करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सूतोवाच केले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार झालेले प्रकाश आंबेडकर यांच्या समोर भाजपने नवखा उमेदवार अनुप धोत्रे यांना संधी दिली आहे. अनुप धोत्रे हे खासदार व माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत. अद्याप काँग्रेस उमेदवार कोण, असा प्रश्न अनुत्तरीत आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अद्याप काँग्रेसने उत्तर दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील त्या सात जागा कोणत्या याची माहिती काँग्रेसने वंचितला दिली नाही. अशा परिस्थितीत वंचित तूर्तास काँग्रेसच्या सात जागा सोडून इतर जागांवर चाचपणी करत आहे. त्यांचे काही उमेदवार निश्चित असले तरी अद्याप महाविकास आघाडीत मोठे खलबतं सुरू असून, त्यामुळेच वंचितने आज जाहीर होणाऱ्या भूमिकेची अंतिम घोषणा टाळल्याची माहिती आहे, तर ही घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबाबत त्यांची अंतिम घोषणा आज करणार होते. पण, आज ही घोषणा होण्याची शक्यता नाही. ही घोषणा 27 मार्च रोजी होईल आणि त्यानंतर गुरुवार, 28 मार्च रोजी अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित नेते प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करतील. तशा सूचना कार्यकर्ते व नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

वंचितने महाविकास आघाडीसोबत शेवटपर्यंत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, अद्याप घोषणा न झाल्याने त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. अशा परिस्थितीत आता बुधवारी,27 मार्च रोजी वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबाबत काय भूमिका जाहीर करतात हे पाहण्यासारखे ठरेल. गुरुवार, 28 मार्च रोजी वंचित नेते प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी घोषणाच वंचितने केली आहे.

R

Prakash Ambedkar
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये यंदा भुजबळांचे 'ओबीसी' कार्ड चालणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com