Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलचे आकडे आले, 'त्या' व्हिडिओवरून ठाकरेंना डिवचले, 'खटाखट खटाखट...'

Atul Bhatkhalkar scoffed Uddhav Thackeray : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणीत एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहे. तर, काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला 150 पेक्षा अधिक जागा मिळत आहेत.
Uddhav Thckeray
Uddhav Thckeray Sarkarnama

Lok Sabha Exit Poll : इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणारच, असे प्रचारात उद्धव ठाकरे ठणकावून सांगत होते. आणि प्रचार सभांमधून इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदींना निमंत्रण देत होते. ठाकरेंचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, एक्झिट पोल नंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी हेच व्हिडिओ ट्विट करत 'खटाखट, खटाखट, खटाखट …' असे कॅप्शन देत ठाकरेंना डिवचले आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणीत एनडीएला NDA 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहे. तर, काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला 150 पेक्षा अधिक जागा मिळत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अतुल भातखळकरांनी ठाकरेंना डिवचले आहे.

राहुल गांधीं आपल्या भाषणात इंडिया आघाडीचे सरकार आल्या नंतर महिलांच्या खात्यात खटाखट खटाखट पैसे जमा होणार असल्याचे सांगत होते. राहुल गांधींचा 'खटाखट' हा शब्द प्रचारा दरम्यान प्रसिद्ध झाला होता. त्याच शब्दाचा वापर करत भातखळकरांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

Uddhav Thckeray
Maharashtra Lok Sabha Exit Poll Results : महाराष्ट्रातून धोका, तरीही मोदीच येणार! भाजपच्या यशाचं गमक काय?

महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार

एक्झिट पोलचे अंदाज काही असो आम्ही 35 जागा जिंकणार, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले आम्ही जमीनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे काय होणार हे आम्ही सांगू शकतो. महाविकास आघाडीला 35 पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com