LPG Price Hike: गॅस सिलेंडर पुन्हा महागणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका

Domestic LPG cylinder prices may increase again: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढू शकतात. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी, वाढलेला वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे दरवाढीचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
LPG Cylinder price Hikes
LPG Cylinder price HikesSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आधीच आर्थिक ताण वाढला आहे. अशातच केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा संकेत देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे आगामी काळात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढू शकतात, असे केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी ( Pralhad Joshi) यांनी म्हटले आहे.

गॅस दरवाढीमागे नेमके कारण काय?

सध्या जगभरात तणावाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर होत आहे. अनेक देशांमध्ये मालवाहतूक आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने एलपीजीची उपलब्धता कमी झाली आहे, असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

गॅसचा मूळ खरेदी खर्च वाढला असून एका देशातून दुसऱ्या देशात गॅस पोहोचवण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. यामुळे वाहतूक आणि विमा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या सर्व कारणांचा थेट परिणाम गॅसच्या किमतींवर होत असल्याचे जोशी यांनी म्हटलं आहे.

7 जूनलाच झाली होती दरवाढ

याआधी 7 जून रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 942 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

LPG Cylinder price Hikes
Shivsena Corporator Disqualified : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, नगरसेवकाचे पद रद्द! महापालिकेतील राजकीय समीकरण बदलणार?

सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याचबरोबर यापूर्वीच व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि खाद्य व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे.

LPG Cylinder price Hikes
Shetkari Karjmafi: ₹2 लाखांची कर्जमाफी हुकणार? 'या' शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

पुन्हा वाढ होण्याची शक्यता

आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याचे सांगितले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवरच पुढील दर ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com