

Shivsena News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे उल्हासनगरपालिकेत खळबळ उडाली आहे. निवडणुकीत पॅनल क्रमांक 6मधून निवडून आलेले नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.
विकी सिंग लबाना यांनी बंजारा जातीचे प्रमाणपत्र सादर करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडणुकीत विजय देखील मिळवला होता. मात्र, निकालच्या अवघ्या चार महिन्यातच त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले.
जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी विकी सिंग लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. जात पडताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, लबाना यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
जात पडताळणी प्रक्रियेत लबाना यांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी अडळल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली. याची माहिती महापालिकेला कळवण्यात आली. त्यानंतर पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकृत आदेश काढत विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे या जागेवर पुन्हा निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये जागांचे अंतर कमी आहे. त्यामुळे एकाएका नगरसेवकाचे महत्त्व निवडणुकीनंतर वाढले होते. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र आले. शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौर पद आहे. त्यामुळे लबाना यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापालिकेच्या समीकरणामध्ये फारसा फरक पडणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.