LPG News Rules: 1 ऑगस्टपासून LPG चे नियम बदलणार! OTP, सबसिडी, बुकिंग ते PNG; जाणून घ्या काय बदलणार

LPG Booking News: 1 ऑगस्टपासून LPG ग्राहकांसाठी नवे नियम लागू. बुकिंग, OTP, उज्ज्वला सबसिडी, PNG कनेक्शन, नवीन सेवा आणि सिलेंडर डिलिव्हरीबाबत महत्त्वाचे बदल जाणून घ्या.
LPG Gas Cylinder
LPG Gas CylinderSarkarnama
Published on
Updated on

LPG Rules August 2026: येत्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू करण्यात येणार आहेत. गॅस बुकिंगची पद्धत, डिलिव्हरीचे नियम, उज्ज्वला योजनेतील सबसिडी, नवीन कनेक्शन, पीएनजी (PNG) घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरांपर्यंत अनेक बाबींमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक एलपीजी ग्राहकाने हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे.

'भारतगॅस लाईट झिप' सेवेला सुरुवात

भारत पेट्रोलियम (BPCL) ने 'भारतगॅस लाईट झिप' ही नवीन सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना कमी कागदपत्रांत आणि जलद प्रक्रियेत नवीन एलपीजी कनेक्शन उपलब्ध होणार आहे. सध्या ही सेवा मुंबईमध्ये सुरू आहे. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत देशातील २४ राज्यांतील १०० शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे.

स्विगी इन्स्टामार्टवरूनही मिळणार LPG सिलेंडर

एचपीसीएलने (HPCL) स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून 'HP नव्य' (१० किलो) आणि 'HP अप्पू' (५ किलो) एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. सध्या ही सुविधा बंगळुरूमध्ये सुरू आहे. भविष्यात इतर शहरांमध्येही विस्तार अपेक्षित आहे. पहिल्या ऑर्डरवेळी ग्राहकांना ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

LPG Gas Cylinder
Sangli District Bank: कोल्हापूरनंतर सांगली जिल्हा बँकेलाही RBI चा दणका; माजी आमदार मानसिंगराव नाईकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

उज्ज्वला योजनेतील सबसिडीवर नवा नियम

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) अनुदानित गॅस रिफिलच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वर्षाला ९ सिलेंडरवर अनुदान मिळत होते. आता ते कमी करून वर्षाला ४ सबसिडी रिफिल इतके करण्यात आले आहे. सरकारच्या मते, लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष वापराचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

घरगुती LPG सिलेंडरचे दर

१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

* दिल्ली – ₹942

* मुंबई – ₹941.50

* कोलकाता – ₹968

* चेन्नई – ₹957.50

* बंगळुरू – ₹950

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या दरांचा आढावा घेतात.

LPG Gas Cylinder
ED Raid: दरवाजा बंद होताच शिडीवरून घरात घुसले ED अधिकारी; 600 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश, ईडीची सर्वात मोठी कारवाई!

व्यावसायिक सिलेंडर झाला स्वस्त

१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. सलग अनेक महिन्यांच्या दरवाढीनंतर प्रथमच व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या कपातीचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना होणार आहे.

PNG घेतल्यास LPG कनेक्शन सरेंडर करणे आवश्यक

सरकारच्या नव्या नियमानुसार, एखाद्या ग्राहकाने पीएनजी (PNG) कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत विद्यमान एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे बंधनकारक असेल. मात्र भविष्यात पीएनजी सुविधा नसलेल्या भागात स्थलांतर झाल्यास जुने एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करता येणार आहे. त्यासाठी एलपीजी बंद करताना मिळणारे 'ट्रान्सफर व्हाऊचर' जतन करून ठेवावे लागेल.

OTP शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर

एलपीजी वितरण प्रक्रियेतही मोठा बदल करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करताना ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP किंवा Delivery Authentication Code (DAC) पाठवला जाईल. हा कोड डिलिव्हरी एजंटला दिल्यानंतरच सिलेंडर ग्राहकाकडे सुपूर्द केला जाईल. OTP न दिल्यास डिलिव्हरी पूर्ण होणार नाही.

लॉक-इन कालावधी कायम

एलपीजी रिफिलसाठी लागू असलेला लॉक-इन कालावधी मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

* शहरी भाग – २५ दिवस

* ग्रामीण भाग – ४५ दिवस

या कालावधीपूर्वी नवीन रिफिल बुक करता येणार नाही.

ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे?

ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे एलपीजी ग्राहकांनी मोबाईल क्रमांक अपडेट ठेवणे, डिजिटल बुकिंगला प्राधान्य देणे, OTP प्रणालीची माहिती ठेवणे आणि पीएनजी कनेक्शन घेतल्यास एलपीजी सरेंडरच्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी सबसिडीच्या नव्या नियमांची माहिती घेऊनच पुढील रिफिलचे नियोजन करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com