MVA Rift : महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरेंच्या भूमिकडे लक्ष; काँग्रेस नेते आक्रमक

Delimitation Bill Sharad Pawar Uddhav Thackera : डिलिमीटेशनच्या बिलाच्या पाठींब्यावरून महाविकास आघाडी फुटणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत चर्चा आहेत.
MVA Rift Sharad Pawar, Uddhav Thackeray , Nana Patole
MVA Rift Sharad Pawar, Uddhav Thackeray , Nana PatoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

MVA News : डिलिमीटेशनच्या बिलाच्या पाठींब्यावरून महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. जर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बिलाल पाठींबा दिला तर राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून त्यांना थेट विरोध केला जाईल आणि महाविकास आघाडी फुटेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यसभेत शरद पवारांना जाण्यासाठी काँग्रेसने कसा पाठींबा दिला होता, याची आठवण देखील करून दिली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून डिलिमीटेशनच्या बिलाला पाठींबा असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी बिल समोर आल्यानंतर भूमिका घेऊ, असे सांगितले. मात्र,या बिलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाठींबा दिला जाणार असल्याची चर्चा आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

खासदार संजय राऊत यांनी बिलाला विरोध केला आहे. तर, खासदार अरविंद सावंत यांनी बील समोर येऊद्या त्यानंतर चर्चा करू, असे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंचे लोकसभेतील तीन खासदारांना ठाकरे काय भूमिका घ्यायला सांगणार हे उद्याप स्पष्ट झाले नाही. जर, बिलाल थेट पाठींबा दिला नाही तरी सभागृह त्याग करण्याचा त्यांच्याकडे पर्याय आहे. आणि त्याचाच फायदा भाजप होईल. दरम्यान, काँग्रेसची भूमिका ही या बिलाच्या विरोधातील आहे.

MVA Rift Sharad Pawar, Uddhav Thackeray , Nana Patole
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वाढवली भाजपची धडधड, डिलिमीटेशनवर भूमिका बदलणार? खासदाराने स्पष्टच सांगितलं...

भाजपने संख्याबळ जमवले?

भाजप सरकारकडून बिलाच्या मंजूरसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमवल्याची चर्चा आहे. डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोधात भूमिका घेतली तरच हे बिल मंजूर होणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, डीएमकेने आपल्या दोन अटी जाहीर केल्या आहेत. त्या मान्य झाल्यातरच पाठींबा दिला जाणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी डीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे हे बिल विनाअडथळा पास होईल, असा अंदाज आहे.

MVA Rift Sharad Pawar, Uddhav Thackeray , Nana Patole
BJP News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या बड्या नेत्याला 'जोर का झटका'; उच्च न्यायालयाकडून थेट आमदारकीच रद्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.