Maharashtra Election 2026 Result live updates : एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर! मुंबई पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांमध्ये मतदारांचा कौल कुणाला? जाणून घ्या

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Result live Updates : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं आहे. तर आज या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्याआधी एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आहेत ते नेमके कसे आहेत? यासह आज 16 जानेवारीच्या दिवसभरातील निकालाच्या सर्व अपडेट्स जाणून घेऊया.
Maharashtra Municipal Corporation Election 2026 Result live Updates
Maharashtra Municipal Corporation Election 2026 Result live Updates Sarkarnama

PMC Elections Result Live Update  :पुणे महापालिका प्रभाग निहाय मतदान

पुणे महापालिका प्रभाग निहाय मतदानाची मध्यरात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे

१ - ५२.९०

२ - ५०.२८

३ - ५४.१२

४ - ५६.६५

५ - ५१.४३

६ - ५४

७ - ४९.७६

८ - ४५.१२

९ - ५२.९३

१० - ५५.०५

११ - ५६.६८

१२ - ४९.३२

१३ - ५०.४५

१४ - ५२.१३

१५ - ५५.८८

१६ - ५१.९८

१७ - ४९.९१

१८ - ४५.५४

१९ - ४७.९७

२० -५३.५०

२१ -५०.९७

२२ -५३.४९

२३ -५१.९७

२४ -५४.७५

२५ -५४.००

२६ -५२.५२

२७-५२.००

२८-५४.००

२९ -५१.३४

३०- ५५.५२

३१ - ५२.०७

३२ - ५५.३९

३३ - ५८.८१

३४ - ५४.९२

३५ - ४८.५९

३६ - ५४.६

३७ - ४९.०९

३८ - ५४.०१

३९ -५२

४० -५०

४१-४९.७८

PMC Elections Result Live Update : पुणेकरांचा कौल कोणाला? पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान

पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न

१८ लाख ६२ हजार पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी मात्र संध्याकाळी मोठ्या संख्येने पुणेकर पडले बाहेर

एकूण मतदार: १८ लाख ६२ हजार ४०८

पुरुष मतदार: ९ लाख ७३ हजार ५०३

महिला मतदार: ८ लाख ८८ हजार ८०९

इतर मतदार: ९६

सर्वाधिक मतदान झालेला प्रभाग: शिवणे खडकवासला प्रभाग ३३ (५८ टक्के)

सर्वात कमी मतदान झालेला प्रभाग: औंध बोपोडी, प्रभाग ८ (४५ टक्के)

BMC Elections Result Live Update : अरुण गवळींचा पक्ष लढवलेल्या सर्व जागा जिंकण्याचा अंदाज

मुंबई महापालिकेच्या दोन जागा लढवणाऱ्या अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा या दोन्ही जागांवर विजय होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

BMC Elections Result Live Update : वंचितला भोपळा तर काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज

ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 150 जागा लढवलेल्या काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 45 जागा लढवलेल्या वंचित एकाही जागेवर विजयी होणार नसल्याचा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

BMC Elections Result Live Update : मुंबईत भाजपला सर्वाधिक 127 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यानुसार मुंबईत 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक 127 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 54 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसनेला 44 ते 58, तर मनसेला फक्त 6 जागा मिळतील असा अंदाज ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Elections Result Live Update : पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान

पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी नागरिकांनी मतदान केलं आहे. पुण्यातील १८ लाख ६२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर! मुंबई कुणाची? पुणेकरांचा कैल कुणाला? जाणून घ्या

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज मुंबईसह सर्वच महापालिकेचे निकाल जाहीरहोणार आहेत. पण त्याआधीच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले असून मुंबईत ठाकरे बंधूंना झटका बसला आहे. येथे डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार महायुतीतील भाजप-शिवसेनेला (शिंदे) १०७ ते १२२ जागा मिळतील. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ६८ ते ८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेना युतीला १३१ ते १५१ जागा, ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ आणि काँग्रेसला १२ ते १६ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com