Exit Poll Result : मराठवाड्यातील 3 महापालिकांवर भाजपचंच कमळ फुलणार? दोन ठिकाणी चुरस, काय आहेत एक्झिट पोलचे अंदाज?

Marathwada Civic Polls News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड व जालना या पाच महापालिकेसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये नांदेड, जालना याठिकाणी भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप मोठा पक्ष ठरू शकतो.
exit polls
exit pollssarkarnama
Published on
Updated on

chattrapati sambhajinagr News : राज्यातील २९ महापालिकेसाठी गुरुवारी मतदान पार पडले. सर्वत्र उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता शुक्रवारी होत असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकणाचे मतदान पार पडताच एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज समोर आले आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, लातूर व जालना या पाच महापालिकेसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये नांदेड, जालना याठिकाणी भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची सत्ता येईल तर भाजप पहिल्यांदाच मोठा पक्ष असणार आहे. परभणीत काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. तर लातूरमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे.

साम टीव्हीने वर्तवलेल्या अंदाजानुसार जालन्यात 65 पैकी 28 जागा भाजपला तर 22 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला (Shivsena) मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी पाच जागांची आवशकता आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 22 जागा मिळत असल्याने याठिकाणी महायुतीची सत्ता येऊ शकते.

exit polls
BJP vs Shivsena : शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; मतदानाच्या आदल्यादिवशी भाजप-शिवसेनेत राडा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पहिल्यांदाच भाजप हा मोठा पक्ष ठरत आहे. याठिकाणी 115 पैकी 36 जागा भाजपला मिळण्याचा अंदाज आहे तर 24 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला आठ, राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बारा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे एमआयएमला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र आता बहुमत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील तीन पक्ष एकत्र आल्यास याठिकाणी महायुतीचा महापौर होऊ शकतो.

exit polls
BJP vs Shivsena : शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; मतदानाच्या आदल्यादिवशी भाजप-शिवसेनेत राडा

परभणीत काँग्रेस-शिवसेना (युबीटी) आघाडी 34 जागा मिळवून निर्णायक ठरण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता असून, भाजपला 8 जागांवर समाधान मानावे लागणार असे दिसते. स्वबळावर लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेलाही 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

exit polls
BJP vs Shivsena : शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; मतदानाच्या आदल्यादिवशी भाजप-शिवसेनेत राडा

नांदेड महापालिकेत 81 पैकी 39 जागा भाजपला तर 15 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 12, तर इतर पक्षाला 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी भाजपला स्वबळावर बहुमत मिळत आहे.

exit polls
Shiv Sena UBT Politics : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने, भाजपात गेलेल्या विनायक पांडेंचा पंचनामाच केला!

लातूर महापालिकेत 70 पैकी 28 जागा भाजपला तर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 33 जागा मिळण्याची शक्यता तर अपक्षाला तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी 8 जागांची आवशकता आहे. तर दुसरीकडेअजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळत असल्याने याठिकाणी महायुतीची सत्ता येऊ शकते. त्यासाठी दोन जागांची गरज आहे तर काँग्रेसला बहुमतासाठी तीन जागांची गरज भासणार आहे.

exit polls
BJP Politics : उपनगराध्यक्षपदासाठी भाजपची राजकीय खेळी, स्वीकृतसाठी नामनिर्देशन दाखलच करू दिले नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com