Local Body Elections : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी : निवडणूक आयोगाने तारखा निश्चित केल्या; 29 महापालिकांसाठी आजपासूनच आचारसंहिता?

Maharashtra municipal corporation elections : आज निवडणूक आयोग सर्व २९ महापालिकांसाठी कार्यक्रम जाहीर करणार की त्यातून नागपूर व चंद्रपूर वगळणार याबाबत संभ्रम आहे.
Local-Body-Elections
Local-Body-ElectionsSarkarnama
Published on
Updated on

State Election Commission Maharashtra : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधी होणार, याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांची तयारी पूर्ण केली असून वेळापत्रकही निश्चित केले आहे. आजपासून या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. काल आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना सज्ज राहण्याचे आदेश दिले होते.

राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत २९ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. काल तसे संकेत आयोगाने सर्व आयुक्तांना दिलेल्या आदेशातून स्पष्टपणे दिले होते. त्यामुळे आता या तारखांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान असण्याची शक्यता आहे.

राज्यातील चंद्रपूर आणि नागपूर महापालिकेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही मर्यादा ओलांडू न देता निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या दोन महापालिकांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही.

Local-Body-Elections
Tukaram Mundhe News : अधिवेशनात आरोप होत असताना तुकाराम मुंढेंचा विधानभवनातील व्हिडीओ व्हायरल; तीन शब्दांतच दिला संदेश...

आज निवडणूक आयोग सर्व २९ महापालिकांसाठी कार्यक्रम जाहीर करणार की त्यातून नागपूर व चंद्रपूर वगळणार याबाबत संभ्रम आहे. नागपूर आणि चंद्रपूरचा समावेश केल्यास आरक्षणाची सोडत काढावी लागेल. अन्यथा ५० टक्क्यांच्यापुढे आरक्षण असूनही निवडणूक घेतल्यास २१ जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या याबाबतच्या सुनावणीची टांगती तलवार निकालावर असणार आहे.

Local-Body-Elections
BJP working president : देशाच्या राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा, मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र

‘या’ महापालिकांमध्ये होणार निवडणूक :

बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण–डोंबिवली, नवी मुंबई, मीरा–भाईंदर, भिवंडी–निजामपूर, वसई–विरार, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज–कुपवाड, इचलकरंजी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, लातूर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, अहिल्यानगर (नगर), मालेगाव, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com