Election Campaign End : ठाकरेंपेक्षा फडणवीस ठरले भारी! कुणी लावली किती ताकद? मैदानावर ठोकला शड्डू

Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 36 प्रचार सभा घेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर दोन्ही ठाकरे बंधूनी सर्वात कमी सभांचे आयोजन केले आहे.
Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: सर्वाधिक ठिकाणी निवडणूक लढवत भाजपने आघाडी घेतली आहे. मुंबई, ठाणे कल्याण डोंबवली महापालिकेत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे तर अन्य ठिकाणी भाजप स्वबळ आजमावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 36 प्रचार सभा घेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर दोन्ही ठाकरे बंधूनी सर्वात कमी सभांचे आयोजन केले आहे. त्यामुळे या सभांचा नेमका कुणाला फायदा होणार हे 16 जानेवारीला कळणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे तर शुक्रवारी मतमोजणी होणार असल्याने त्याच दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी या निवडणुकीवेळी अनेक स्थित्यांतरानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचेही दिसले. त्यामुळे बहुतांश राजकीय पक्षातील उच्चपदस्थ नेतेही प्रत्यक्षात मैदानात उतरत प्रचार करताना दिसून आले आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Thackeray VS BJP : भाजपचे शस्त्र त्यांच्यावर उलटणार? मुंबईसाठी ठाकरेंच्या शिलेदाराकडून 'ती' घोषणा

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राज व उद्धव ठाकरेंपेक्षा सीएम देवेंद्र फडणवीस भारी ठरले आहेत. फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या 35 प्रचार सभा झाल्यात. तर, जवळपास 25 ते 30 इतर नेत्यांच्या प्रचार रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. तर महानगरपालिका निवडणूक प्रचारात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 14 महानगरपालिका क्षेत्रात 26 सभा घेतल्या, तसेच 33 पदयात्रा केल्या.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
BJP vs NCP : 'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल

महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी एकूण 25 जाहीर सभा घेतल्या आणि 10 रोड शो केले. त्यापैकी 21 सभा पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये तर मिरज, परभणी, अमरावती व लातूर येथील प्रत्येकी एका सभेचा समावेश आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 सभा घेतल्यात तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 3 सभा घेतल्या आहेत.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Congress news : काँग्रेसला धक्का; उद्धव सेना- भाजपचे प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य

महापालिका निवडणुकीसाठी कोणी किती घेतल्या प्रचार सभा

देवेंद्र फडणवीस - 36, अजित पवार - 25, एकनाथ शिंदे - 29, उद्धव ठाकरे - 03, रवींद्र चव्हाण - 35, हर्षवर्धन सपकाळ - 25, राज ठाकरे - 03.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
BJP vs NCP : 'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल

फडणवीस यांचे एकूण 77 इव्हेंट:

एकूण सभा/रोड शो 37, सभा ठिकाण: मुंबई-7, नागपूर-5, पुणे-2, व इतर प्रत्येक-1: सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मिरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई/रोड शो ठिकाण: इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगांव, पिंपरी चिंचवड, नागपूर.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Shivsena UBT Politics: वसंत गिते यांचे अस्तित्व पणाला, भाजपसह स्वपक्षीयांनीही घेरल्याने महापालिकेसाठी एकहाती लढत!

सहा ठिकाणी घेतल्या मुलाखती

ठाणे : तेजश्री प्रधान, मिलींद बल्लाळ, छत्रपती संभाजीनगर : समीरा गुजर, नागपूर : भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी, पुणे : गिरीजा ओक, कोल्हापूर : कृष्णराज महाडीक, स्वप्नील राजशेखर, पनवेल प्रसाद ओक, अमृता खानविलकर, अशा सहा मुलाखती घेतल्या आहेत.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
BJP Politics: मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपचा धाडसी निर्णय; पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडे यांना बाहेरचा रस्ता!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com