BJP vs NCP : 'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल

Ajit Pawar vs Chandrakant Patil : 78 शिक्षण संस्थांचे अनुदान पुन्हा सुरु करण्याची फाइल 120 वेळा पवारांनी परत पाठवली. 5 हजार 500 प्राध्यापकांच्या भरतीची फाइल मंजूर करून घेण्यासाठी आम्हाला त्यांच्यापुढे डोकं आपटावे लागले. पैसे नसल्याचे कारण देऊन मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल 6 महिने अडवून ठेवलेली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
Chandrakant Patil vs Ajit Pawar
Chandrakant Patil vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Jan : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना आव्हान देत असताना आता राज्य सरकारमधील कुरबुरी यानिमित्ताने समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 10) त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सर्व नागरिकांसाठी पीएमपी आणि मेट्रो प्रवास मोफत देणार अशी घोषणा केली.

त्यावर भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. 'पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून येणारे अजित पवार पुणेकरांना मोफत पीएमपी, मेट्रो कशी देणार? मोफत प्रवासाचा निर्णय घ्यायचा असले तर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय आणावा लागेल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील,' अशा शब्दात टीका केली आहे.

भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धोरणात्मक व आर्थिक निर्णय हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत होतात. पीएमपी व मेट्रोच्या मोफत प्रवास योजनेची घोषणा केली असली तरी अजित पवारांना आपण विजयी होणारच नाही.

Chandrakant Patil vs Ajit Pawar
PMC Election : पुण्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात देखील 'मविआ'तील मित्र पक्ष आमने-सामने; सपकाळांच्या 'त्या' आदेशामुळे काँग्रेसचे 2 उमेदवार ठरले बंडखोर

हे माहिती असल्यानेच असे बोलण्यासाठी त्यांचे काही जात नाही. ही योजना कशी राबविणार असे प्रश्‍न विचारल्यावर ते घड्याळाचे बटण दाबले की मोफत तिकीट मिळेल असे सांगत आहे. यास काही अर्ध नाही. पवार यांनी बार्टी, सारथी, आर्टी यांची शिष्यवृत्तीवर मोठा खर्च होत असल्याचे विधानसभेत सांगितले.

78 शिक्षण संस्थांचे अनुदान पुन्हा सुरु करण्याची फाइल 120 वेळा पवारांनी परत पाठवली. 5 हजार 500 प्राध्यापकांच्या भरतीची फाइल मंजूर करून घेण्यासाठी आम्हाला त्यांच्यापुढे डोकं आपटावे लागले. पैसे नसल्याचे कारण देऊन मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल 6 महिने अडवून ठेवलेली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

Chandrakant Patil vs Ajit Pawar
BJP Sujay Vikhe : 'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही'; तयारीत असल्याचा विखेंचा सूचक इशारा

त्यामुळे अजित पवार यांची ही घोषणा फसवी आहे. कोथरूडमध्ये गेल्या सहा महिन्यापासून आम्ही मेट्रो स्टेशनच्या परिसरात मोफत बससेवा सुरु केली आहे. अशाच पद्धतीने कमी दरात रिक्षाची सेवाही उपलब्ध केली जाणार असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या आश्वासनावर संशय उपस्थित करत टीका देखील केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com