मोठी अपडेट: महायुतीची धाकधूक वाढली! उमेदवारी दाखल करण्यास काही तासच शिल्लक; मुंबईत ठरले तर 'या' महापालिकेत घोडे अडलेलच!

29 municipal corporations election News : महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बोलणी सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी निवडणूक लढवत आहे.
Mahayuti Municipal Election Victory 2025
Mahayuti Municipal Election Victory 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 48 तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीचे घोडे अडलेलच आहे. महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बोलणी सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी निवडणूक लढवत आहे.

सध्या तरी मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेनेचे जवळपास ठरले आहे. काही जागांवर अद्याप बोलणी सुरु आहे. तर पुणे, ठाणे आणि वसई-विरारमध्ये दोन्ही पक्षांची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मीरा भाईंदरमध्ये चर्चा थांबली आहे तर अमरावती, सोलापूरमध्ये महायुती फिस्कटली आहे. तर काही महापालिकेत अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.

मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेनेचे (Shivsena) जवळपास ठरले आहे. केवळ 20 जागांवर अद्याप बोलणी सुरु आहे. त्याठिकाणीही लवकरच तोडगा काढला जाणार आहे. तर पुणे महापालिकेत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ठाणे, वसई-विरारमध्ये दोन्ही पक्षांची बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Pune BJP : पुण्यात कुटुंबातील उमदेवारांसाठी फिल्डिंग लावलेल्या आमदार-खासदारांना धक्का : मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पत्ते कट

सोलापूर महापालिकेत दोन्ही पक्षामधील महायुती तुटली आहे. त्याठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असल्याची घोषणा माजी मंत्री व शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली आहे. दोघांनाही 45-45 सामान जागा वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीत भाजप 45 ते 50 जागांवर लढण्याच्या तयारीत असताना, शिंदे गट आणि राणांच्या 'युवा स्वाभिमान' पक्षाला किती जागा द्यायच्या, यावरून महायुती फिस्कटली असल्याची चर्चा रंगली आहे.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Shivsena Politics : जागा वाटपाच्या बैठकीत शिवतारे-भानगिरे यांची एकमेकांना शिवीगाळ, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबतच्या महायुतीबाबत 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. भाजपने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण-डोंबवली महापालिकेतही दोन्ही पक्षा दरम्यान चर्चा सुरु आहे. याठिकाणी चर्चा सुरु असल्याने धूआप एकमत झालेले नाही. युतीवरून दोन्ही पक्षातून दबाव आणला जात आहे.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Ajit Pawar NCP Nashik : नाशिकमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला 'मविआ' सोबत जायचंय? उद्धव ठाकरेंच्या नेत्याने केला दावा..

महायुतीची धाकधूक वाढली!

मुंबई महापालिकेतील पेच सुटला असला तरी नाशिक, अमरावती आणि सोलापूरमध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप कायम आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हातात काही तास शिल्लक आहेत. पण नेत्यांच्या बैठका संपता संपेनात. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Congress strategy : महादेव जानकरांचा भाजपवर बॉम्बगोळा! महायुतीसोबतचा संसार मोडण्याचे कारणच जगजाहीर केले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com