Shivsena Politics : जागा वाटपाच्या बैठकीत शिवतारे-भानगिरे यांची एकमेकांना शिवीगाळ, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

Pune Shivsena Meeting dispute : शिवतारे आणि भानगिरे यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "त्या दोघांमध्ये वाद झालेले नाहीत. शिवसेना पक्षाच्या चौकटीतच पक्षाचे सर्व नेते काम करतात. भानगिरे हे त्यांचे खासगी काम असल्याने बैठकीमधून लवकर गेले. बाकी काही घडलेले नाही."
Vijay Shivtare and Nana Bhangire dispute
Shiv Sena leaders Vijay Shivtare and Nana Bhangire during a tense Pune meeting where disagreements over seat sharing reportedly led to a heated argument.Sarkarama
Published on
Updated on

Pune News, 28 Dec : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार बैठकांचं आयोजन केलं जात आहे. या बैठकांमध्ये जागा वाटप आणि युती संदर्बातील चर्चा केल्या जात आहेत. मात्र, पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आयोजित केलेल्या अशाच एका बैठकीत दोन नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे.

आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत वाटाघाटी करताना कोणकोणते मुद्दे असावेत, या बाबत विचारविनिमय करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे, अजय भोसले इत्यांदी नेत्यांची बैठक शहराच्या मध्यवर्ती भागातील एका हॉटेलमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत भाजपकडे द्यायच्या २५ जागांच्या यादी संदर्भात चर्चा सुरू होती. या यादीतील हडपसर आणि परिसरातील काही नावांबाबत नाना भानगिरे आग्रही होते. परंतु, विजय शिवतारे यांनी त्या नावांत बदल केला. शहरातील आणि ग्रामीण भागातील उमेदवारांवरून सुरू झाला या दोन नेत्यांमधील वादहमरीतुमरीवर गेला.

Vijay Shivtare and Nana Bhangire dispute
Shivsena Politics : शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर नीलम गोऱ्हेंचा यू-टर्न: शिवसेनेनेच्या 25 उमेदवारांची यादी उदय सामंतांकडे

यावेळी दोघांनीही एकमेकांना चक्क शिवीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या वादानंतर भानगिरे यांना भावना अनावर झाल्या आणि ते थेट रडत या बैठकीतून ते निघून गेल्याचं उपस्थितांनी सांगितलं. भानगिरे यांचा बैठकीतून बाहेर पडतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vijay Shivtare and Nana Bhangire dispute
Jalgaon Politics : जळगावात सध्या फक्त शिवसेना-भाजपची युती फिक्स ; अजितदादांना सोबत घेणार की नाही?

दरम्यान, शिवतारे आणि भानगिरे यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "त्या दोघांमध्ये वाद झालेले नाहीत. शिवसेना पक्षाच्या चौकटीतच पक्षाचे सर्व नेते काम करतात. भानगिरे हे त्यांचे खासगी काम असल्याने बैठकीमधून लवकर गेले. बाकी काही घडलेले नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com