BJP Politics : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या वतीने दीपोत्सव आयोजित केला होता. माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे हे दीपत्सोवाला उपस्थित होते. यावर आक्षेप घेत सार्वजनिक मालमत्तांचा वापर करत आचारसंहिता भंग केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता.
शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपोत्सवाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतल्याचा आरोप करत 'मतांसाठी उद्धव ठाकरे आता धर्म बदलता की काय असा प्रश्न आता हिंदुना पडतोय', अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजपच्या ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना उद्देशून महाराष्ट्रात दीपोत्सव साजरी करायला उद्धव ठाकरेंचा विरोध, दोन दिवसापूर्वीच एका सोसायटीमध्ये काही विशिष्ट समुदयाच्या लोकांनी हिंदूना दिवाळी साजरी करण्यापासून रोखले होते, असे म्हणत टीका करण्यात आली आहे.
शिवजयंतीला कलम 144 लावणारे आणि व्होटबँकसाठी विशिष्ट सणाला कोरोनाचे नियम शिथील करणारे उद्धव ठाकरे हिंदु सणांना विरोध का करत आहेत? असा प्रश्न भाजपच्या ट्विटवरून विचारण्यात आला आहे. तसेच मनसेच्या दीपोत्सवाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाला दिलेले निवदेनचा फोटो देखील ट्विट करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून 'दीपोत्सव' साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. (संदर्भ निवडणूक आयोग उमेदवार निर्देशपुस्तिका प्रकरण ७, उतारा ७६) तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे.
तसेच या कार्यक्रमाव्या उद्घटनावेळी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार श्री. अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविल्याप्रमाणे ही आयोगाचे पत्र क्र. ४३७/६/ओआर/९५/एमसीएस/११५८, दिनांक २९ मार्च, १९९६ तसेच आयोगाचा आदेश क्र.४३७/८/इएस/००२५/९४/एगसीएस, दिनांक २१ ऑक्टोबर, १९९४ (अनुदेशांचे सारसंग्रह, २००४मधील वाथ क्र. १३३ प्रमाणे पुनरुद्धृत केलेले। था नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार श्री. अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक गांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने सखा कारवाईचे निर्देश धावेत, अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे आपणांस करीत आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.