Women Voting : लाडकी बहीण महायुतीला तारणार? महिलांच्या मतांची आकडेवारी डोळे फिरवणारी

maharashtra Assembly election women voting percentage : 2019 च्या तुलनेत तब्बल 57 लाख 96 हजार अधिक महिलांनी मतदान केले आहे. 2019 च्या निवडणुकीत महिलांच्या मतांची टक्केवारी 58.83 टक्के होती. मात्र, यंदा या आकडेवारीत वाढ झाली आहे.
Womens in the que for voting
Womens in the que for votingSarkarnama
Published on
Updated on

Women Voting : आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतो आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचा दावा करण्यात येतो आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार येत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना.

2019 च्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ही वाढलेली टक्केवारी महायुतीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत.

2019 च्या तुलनेत तब्बल 57 लाख 96 हजार अधिक महिलांनी मतदान केले आहे. 2019 च्या निवडणुकीत महिलांच्या मतांची टक्केवारी 58.83 टक्के होती. मात्र, यंदा या आकडेवारीत सहा टक्यांनी वाढ झाली. यंदा महिलांचे मतदान 65 टक्क्यांहून अधिक

Womens in the que for voting
Maharshtra Assembly Election: धाकधूक वाढली; अंतिम आकडेवारीनुसार राज्यातील 'या' दहा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल तब्बल 3 कोटी 6 लाख 49 हजार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 2 कोटी 48 लाख 52 हजार महिलांनी मतदान झाले.

महिलांसाठी योजनांचा पाऊल

महिलांची मतं ही निवडणुकीत महत्त्वाची ठरणार याचा अंदाज महायुती आणि महाविकास आघाडीला आला होता. त्यामुळे महायुतीने लाडकी बहीण योजनेवर भर देताना लाडकी बहीण योजनेतून महिन्याला देणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 करण्याचे आश्वासन दिले. तर महाविकास आघाडी सरकारकडून दरमहा महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

Womens in the que for voting
Parner VidhanSabha Exit Poll 2024 : पारनेरकरांनी एकाच घरात दिली खासदारकी-आमदारकी? लंकेच्या बालेकिल्ल्यात 'रंगल्या पैजा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com