Parner VidhanSabha Exit Poll 2024 : पारनेरकरांनी एकाच घरात दिली खासदारकी-आमदारकी? लंकेच्या बालेकिल्ल्यात 'रंगल्या पैजा'

Ahilyanagar Parner Constituency exit poll NCP SharadChandra Pawar party candidate Rani Lanke NCP Kashinath Date : पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी, असा सामना रंगला असतानाच, खासदार नीलेश लंके यांच्या बालेकिल्ल्यात आमदारकीबाबत 'एक्झिट पोल'ने मोठा अंदाज वर्तवलाय.
Rani Lanke
Rani LankeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाविरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, अशी ही लढत होती.

पारनेरचा आमदार कोण, याची उत्सुकता उद्याच्या मतमोजणीनंतर निकाली निघेल. परंतु एक्झिट पोलनुसार खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विधानसभेत जाणार असा मतदारांचा कौल असल्याचे दिसते. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने उद्याच्या मतमोजणीत काय होते, याची देखील चर्चा आहे.

नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा जिंकली. खासदार झाले. या खासदारकीसाठी लंके यांनी भाजपचे (BJP) दिग्गज नेते विखे यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान दिले. लंके यांच्या खासदार होण्यामागे अनेक अदृश्य शक्ती आहेत. यात मतदारांची ताकद मोठी आहे. असे असले तरी, खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा देखील त्यात मोठा वाटा आहे.

Rani Lanke
Saam Exit Poll 2024 : शिंदे अन् पवार यांच्या राजकीय भविष्यावर 'एक्झिट पोल'चा मोठा अंदाज ...पाहा VIDEO

पारनेर विधानसभा मतदारसंघ राणी लंके यांनी मोठ्या ताकदीने लोकसभा निवडणुकीत संभाळला होता. मतदारसंघातील वाडी-वस्ती त्यांनी पिंजून काढली होती. महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली होती. तसा राणी लंके यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा अनुभव असल्याने त्या विधानसभा निवडणुकीच्या (Election) प्रचारानिमित्ताने अधिक खुबीने महिलांमध्ये मिसळल्या. लोकसभेवेळीत त्यांच्या आमदारकीची चर्चा होऊ लागली.

Rani Lanke
Saam Exit Poll 2024 : विजयाच्या तयारीत गुंतलेल्या कर्डिलेंना 'एक्झिट पोल'मध्ये धक्का; तनपुरेंनी नेमका काय केलाय करिष्मा?

राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी, असा सामना या मतदारसंघात रंगला होता. पहिल्यापासून प्रचारात आघाडीत असलेल्या राणी लंके शेवटच्या टप्प्यात मागे पडल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी चांगलीच आघाडी घेतली. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक तथा जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे इथं तिरंगी लढत होत आहे.

लंके खासदार असताना, पुन्हा त्याच घरात आमदारकी नको, अशी देखील चर्चा होती. महाविकास आघाडीतील नेत्यांना हाच मुद्दा लावून इथं दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणी लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. मतदान झाले आहे, उद्या मतमोजणी आहे. तत्पूर्वी आलेल्या एक्झिट पोलनुसार राणी लंके या आमदार होतील, असा कल दिसतो. राणी लंके विजयी झाल्यास खासदार आणि आमदार, एकाच घरातील होतील आणि हा अहिल्यानगर जिल्ह्यात वेगळा निकाल ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com