
Eknath Shinde News : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले होते. फडणवीस यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंदी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नाही. मात्र, महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे और कांग्रेसवj देखील जोरदार टीका केली. काँग्रेसची नीती ही फूट पाडा आणि राज्य करा, अशी असल्याचा टोला लगावला. तसेच राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंचे नाव का घेत नाही, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर भाषणात सांगत होते की माझ्या पक्षाची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही. मात्र,उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी और मुख्यमंत् होण्यासाठी काँग्रेससोबत गेले. खुर्चीसाठी ते तिकडे गेले. त्यांना वाटले की आमच्या शिवाय सरकार नाही बनू शकत. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असे देखील शिंदेंनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेचे समर्थन केले. तसेच राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त ट्विट केले त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्या हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदय सम्राट म्हणावे.
निवडणुकीत आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटले आमच्या शिवाय सरकार बनू शकत नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला धोका दिला, बाळासाहेबांच्या विचारालांना धोका दिला आणि काँग्रेससोबत सरकार बनवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.