Eknath Shinde : ‘लाडका भाऊ’ ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी! एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सगळंच सांगितलं...

Maharashtra Assembly Election Results Mahayuti CM : एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपण सत्तास्थापनेत अडथळा ठरणार नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतचा बराचसा संभ्रम बुधवार दूर केला. या रेसमध्ये आपण नसल्याचे त्यांनी थेट सांगितले नसले तरी त्यांच्या भूमिकेवरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मार्ग मोकळा केल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठ असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे.

राज्यातील सत्तास्थापनेला विलंब होत असल्याने महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून तिढा असल्याची चर्चा होती. त्यावर पडदा टाकण्यासाठी शिंदे यांनी बुधवार पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण कोणताही अडसर ठरणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फोनवरून कळवले असल्याचे शिंदेंनी सांगितले. ते जे निर्णय घेतील, ते आपल्याला मान्य असेल, असेही ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde
CM Eknath Shinde Press : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला..; ठाकरेंना शिंदेंचा टोला ...पाहा VIDEO

शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान सर्वकाही सांगून जाते. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख राज्यात निर्माण झाली. लाडक्या भावाची ओळख निर्माण झाली ती सर्व पदांपेक्षा मोठी वाटते. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे, असे सांगत शिंदे यांनी आपल्याला कोणतेही पद मिळाले नाही तरी चालेल, अशीच भूमिका मांडल्याची चर्चा आहे.

मी नाराज होऊन रडणारा नाही, लढणारे आहोत. एवढा मोठा विजय हा आतापर्यंतच्या विजयात ऐतिहासिक आहे. आम्ही जे काम केले ते मनापासून केले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करत राहीन. या काळात जनतेचे प्रेम मिळाले, हा आपल्या घरातील मुख्यमंत्री असल्याची त्यांची भावना होती. जनतेतील मुख्यमंत्री अशी ओळख झाली. त्यासाठी नशीब लागते. मी काही लोकप्रियतेसाठी काम केलेले नाही, असे शिंदे यांनी म्हटले.

Eknath Shinde
Eknath Shinde PC : महायुतीच्या ग्रँड विजयाची एकनाथ शिंदेंनी सांगितली दोनच कारणं

लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांसाठी मी काहीतरी केले पाहिजे, अशी माझी भावना होती. गरीब परिवारातून आल्यामुळे त्यांच्या वेदना मला समजत होत्या. तेच मी केलं. महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी काम केले. परिवारातील प्रत्येक सदस्याला सरकारच्यावतीने काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी मिळावे, ही भावना असते. ते आम्ही पूर्ण केले. या काळात केलेल्या कामामुळे मी आनंदी असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.

अडीच वर्षांपूर्वी जेव्हा सरकार बदलले, उठाव केला तेव्हा आम्ही ‘चट्टान की तरह’ तुमच्या मागे उभे राहू, असे मोदी व शहांनी म्हटले होते. त्याप्रमाणे केंद्रातून मोदी आणि शाहांचे पूर्ण पाठबळ आम्हाला होते. अडीच वर्षे त्यांनी ताकदीने आमच्या मागे उभे राहिले. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षे मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. ते दिवस मला आठवत आहेत. त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर जनतेच्या हितासाठी केला, असे सांगत शिंदेंनी मोदी आणि शाहांचे आभारही मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com