Pune Assembly Election : कांदा, लाडक्या बहिणी कोणाला हसविणार? पुणे जिल्ह्यात चुरस, उत्कंठा शिगेला

Assembly elections Pune district tight race: मतदानाची वाढलेली टक्केवारी आमच्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करत असल्याने नक्की कोणाच्या पारड्यात मते पडणार ? हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.
Mahavikas Aghadi-Mahayuti
Mahavikas Aghadi-MahayutiSarkarnama
Published on
Updated on

गणेश कोरे

Pune News : लोकसभा निवडणुकीत पडलेले कांदा दर आणि संविधान बदलाच्या मुद्द्यावर महायुतीला फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान कांद्याचे वाढलेले दर आणि संविधान बदलाचा मुद्दा आणि लाडक्या बहिणी महायुतीला तारणार की महाविकास आघाडीने उपस्थित केलेले गद्दारी, स्वाभिमान हे मुद्दे आघाडीला तारणार? याची उत्सुकता लागली आहे.

त्याबरोबरच मतदानाची वाढलेली टक्केवारी आमच्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करत असल्याने नक्की कोणाच्या पारड्यात मते पडणार ? हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

जुन्नरमध्ये हिंदुत्ववादी मतदानाने वाढवली उत्कंठा

आमदार अतुल बेनके (घड्याळ) विरुद्ध सत्यशील शेरकर (तुतारी) अशी लढत रंगली असताना, शरद सोनवणे ( बंडखोर, शिवसेना शिंदे गट) आणि आशा बुचके (बंडखोर भाजप) यांनी प्रचारात आघाडी घेत चुरस निर्माण केली होती.

मतदानाच्या आदल्या रात्री आणि मतदानाच्या दिवशी उमेदवारांनी मोठ्याप्रमाणात लक्ष्मीदर्शन केल्याची मोठी चर्चा तालुक्यात रंगली होती. तर सोनवणे यांना अचानक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मतदान केल्याचे चित्र असून सोनवणे यांना झालेल्या मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढवली आहे. तर बुचके या अचानक आजारी पडल्याने त्यांना रूग्णालयात भरती करावे लागले होते. यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी त्या मतदान केंद्रावर फिरू शकल्या नाहीत. याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Vinod Tawde : विनोद तावडेंनी मानले शरद पवारांचे आभार, नेमकं कारण काय?

खेडमध्ये लाल दिवा की मशाल पेटणार?

आमदार दिलीप मोहिते (घड्याळ) विरुद्ध बाबाजी काळे (मशाल) अशी थेट लढत रंगली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेला (ठाकरे गट) एकच जागा मिळाली असल्याने महाविकास आघाडीने (MVA) जोरदार प्रचार केला. तर मोहिते यांना मंत्रिपदाचे आश्‍वासन मिळाल्याने मोहिते यांनी सर्वस्व पणाला लावले होते. यामुळे मोहिते यांनी शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतल्यानेच चित्र असल्याने खेडमध्ये लाल दिवा पेटतो,की मशाल पेटणार यावर मोठ्या पैजा लागल्या आहेत.

डिंभ्यांचे पाणी वळसे पाटील यांना तारणार?

आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील (घड्याळ) आणि देवदत्त निकम (तुतारी) अशी लढत रंगत लढली होती. शरद पवार यांनी सभेत वळसे पाटील यांचे थेट नाव घेऊन यांना पराभूत करा...करा..करा.. असे म्हटल्याने प्रचारात रंगत आणली होती. मात्र, पवार यांच्या या टीकेला वळसे पाटील भावनिक ॲंगल देऊन, टीका शमविण्याचा प्रयत्न केला. तर केलेल्या विकासकामांवर आणि डिंभे धरणाच्या बोगद्यातून कर्जत जामखेडला पाणी देण्याचा मुद्दा जोरकसपणे लावून धरल्याने पाणीप्रश्‍नावर निवडणूक लढविली. यामुळे डिंभे धरणाचे पाणी कोण कोणाला पाजणार हे शनिवारी (ता.२३) स्पष्ट होणार आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Vinod Tawde on Rahul Gandhi : विनोद तावडेंकडून राहुल गांधींना आव्हान; म्हणाले, नालासोपाऱ्यात या...

शिरूरमध्ये घोडगंगा कोणाला तारणार?

अशोक पवार (तुतारी) आणि माऊली कटके ( घड्याळ) यांच्यात झालेल्या लढतीत, अशोक पवार यांच्या घोडगंगा साखर कारखान्याचा मुद्दा विरोधकांनी जोरकसपणे मांडला. कटके यांना विजयी केले आणि सत्ता आली तर केंद्र सरकारच्या आर्थिक सहकार्यातून घोडगंगा पुन्हा सुरू करू, असे आश्‍वासन अजित पवार यांनी दिल्यामुळे आणि भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात भाजपचे (BJP) झुकते माप कोणाकडे जाते यावर अशोक पवार आणि माऊली कटके यांची विजयश्री अवलंबून आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Kolhapur Assembly Election: राज्यात कोल्हापूर भारी! वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?

मावळमध्ये शेळके की भेगडे?

विद्यमान आमदार सुनील शेळके (घड्याळ) विरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे अशी लढत रंगली आहे. भेगडे यांच्या डॅमेज कट्रोलसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश न आल्याने शेळके आणि भेगडे ही रंगत राज्याचे लक्षवेधणारी ठरली आहे.

कोंडे, दगडेंचे मताधिक्य ठरवणार थोपटे, मांडेकरांचे भवितव्य

भोर - वेल्हामध्ये विद्यमान आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) विरुद्ध शंकर मांडेकर (घड्याळ) अशी लढत होत असली तरी, यांच्यापुढे कुलदीप कोंडे (शिवसेना शिंदे गट ) आणि किरण दगडे (भाजप बंडखोर) यांनी रंगत आणली होती. कोंडे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. तर मांडेकर हे मुळचे राष्‍ट्रवादीमध्ये होते. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून, नंतर उमेदवारीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गटात) मध्ये प्रवेश केल्याने ही निवडणुकीत रंग भरले होते. दगडे कोंडे किती मताधिक्य घेतात यावर थोपटे की मांडेकर विजयी होणार ? हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Shivsena News : एक कोटींचं आश्वासन अन् मतांची 'डिमांड'; शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मनसेनं उचललं मोठं पाऊल

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला

विद्यमान आमदार दत्ता भरणे (घड्याळ) आणि भाजपमधून राष्‍ट्रवादी (शरद पवार गटात) मध्ये आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शरद पवार यांच्यासोबत विशेष सख्य असलेले सोनई दूध संघाचे दशरथ माने यांचे सुपुत्र प्रवीण माने यांनी हर्षवर्धन पाटलांना विरोध करत बंडखोरी केल्याने इंदापूरची लढत चुरशीची झाली आहे.

कुल यांना मंत्रिपद तारणार?

दौंडमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल यांना २० हजारांचे मताधिक्य द्या कॅबिनेट मंत्री आणि २० पेक्षा कमी मताधिक्य दिल्यास राज्यमंत्री अशी थेट घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सांगता सभेत केल्याने हे आश्‍वासन कुल यांना मंत्री करणार? की, त्यांचे विरोधी रमेश थोरात (तुतारी) यांना महाविकास आघाडी तारणार हे शनिवारी (ता.२३) स्पष्ट होणार आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Sillod Assembly Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? सत्तार की बनकर

बारामतीची ओळख कोणामुळे

बारामतची अजित पवार (काका) आणि युगेंद्र पवार (पुतण्या) ही लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. या लढतीत थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी घरोघरी प्रचार केल्याने रंगत वाढली आहे. मात्र, एकीकडे पवार यांचे मानसपुत्र म्हणून संबोधले जाणारे आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांचे नाव घेऊन पराभूत करण्याचे आवाहन पवार यांनी केले असले तरी, बारामतीमध्ये केवळ बारामतीची ओळख कोणामुळे आहे? असा प्रश्‍न उपस्थित करत, अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांचे देखील कौतुक शरद पवार यांनी करत, अजित पवार यांना थेट पराभूत करण्याचे आवाहन न केल्याने योग्य तो संदेश बारामतीकरांना दिल्याची चर्चा बारामतीमध्ये रंगली होती. यामुळे अजित पवार यांचा सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विश्‍वास बारामतीकर सार्थ करणार का? हे शनिवारी स्पष्ट होणार आहे

पुरंदर महायुतीची बिघाडी जगताप यांच्या पथ्यावर?

विद्यमान आमदार संजय जगताप (कॉंग्रेस) यांच्या समोर पारंपारिक विरोधक शिवसेनेचे (शिंदे गट) माजी मंत्री विजय शिवतारे लढत होते. तर महायुतीत बिघाडी होऊन, संभाजी झेंडे घड्याळाच्या अधिकृत चिन्हावर लढत असल्याने या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतर स्पष्‍ट होणार आहे. शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना केलेल्या मदतीची परतफेड होणार की, महायुतीची बिघाडी जगताप यांच्या पथ्यावर पडणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Mahavikas Aghadi : 'मी हे मान्य करणार नाही...'; काँग्रेसच्या नेतृत्वात 'मविआ'चं सरकार, पटोलेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा आक्षेप

तालुकानिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी

जुन्नर - ६८.४४ टक्के

आंबेगाव - ७०.०१ टक्के

खेड आळंदी - ६७.७० टक्के

शिरूर -६८.५० टक्के

दौंड - ७३.२७ टक्के

इंदापूर - ७६.१० टक्के

बारामती - ७१.०३ टक्के

पुरंदर - ६०.०२ टक्के

भोर - ६८.०१ टक्के

मावळ - ७२.१० टक्के

Mahavikas Aghadi-Mahayuti
Rahul Gandhi : गौतम अदानींना आजच अटक करा! राहुल गांधींचा हल्लाबोल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com