Ajit Pawar : कुसुमाग्रजांची कविता अन् विरोधकांवर टोलेबाजी, अजितदादांच्या विधानानंतर एकच हशा; नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Interim Budget Session 2024 : अजित पवारांनी रस्ते, बंदर, उद्योग, महिला, शेतकरी आणि अन्य क्षेत्रांबाबत अर्थसंकल्पात घोषणा केल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget Session 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या दृष्टीनं महत्वाच्या घोषणा पवारांनी अर्थसंकल्पात केल्या आहेत. कवी कुसुमाग्रज यांची कविता म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरूवात केली. तर, अर्थसंकल्पाच्या शेवटही अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या कवितेनं करत विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

Ajit Pawar
Maharashtra Budget 2024 : अजितदादांची खेळाडूंसाठी मोठी घोषणा; सुवर्णपदक विजेत्याला आता एक कोटीचे बक्षीस

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांनी ( Ajit Pawar ) म्हटलं, "कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 'वेडात मराठे वीर दौडले सात', 'क्रांतीचा जयजयकार', 'स्वातंत्र्यदेवतीची विनवणी' यासारख्या कवितेच्या माध्यमातून कुसुमाग्रजांनी मने पेटवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"'कोटी कोटी असतील शरीरे, मनगट अमुचे एक असे, कोटी कोटी देहात आजला, एक मनीषा जागतसे, एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो, राहील रण हे धगधगते!,'" अशी कविता अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Maharashtra Interim Budget 2024: कॉन्ट्रॅक्टर जोमात अन् शेतकरी कोमात; 'अर्थसंकल्पा'वर ठाकरेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया

यानंतर अजित पवारांनी रस्ते, बंदर, उद्योग, महिला, शेतकरी, उर्जा, सिंचन, महाविद्यालय, कामगार, क्रीडा, महापुरूषांची स्मारके आणि विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या.

अर्थसंकल्पाच्या अखेरीस अजित पवारांनी विरोधकांना लक्ष्य केलं. यामुळे विधानसभेत एकच हशा पिकला. "अर्थसंकल्प मांडून झाल्यावर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील. त्या ठरलेल्याच असतात. अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांनी नेहमीच्या प्रतिक्रियांचा थोडा विचार करावा.

कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'प्रकाश पेरा आपल्या भोवती, दिव्यानं दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. भलेपणाचे कार्य उगवत उगाच टीका करू नका,'" असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे.

Ajit Pawar
Maharashtra Interim Budget 2024 : अजित पवारांनी अर्थसंकल्पात केलेल्या 20 मोठ्या घोषणा कोणत्या ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com