Maharashtra Assemby Election : महाराष्ट्रातील ‘टॉप 25’ लढती; ठाकरे, पवार, राणे, पाटील, देशमुखांची प्रतिष्ठा पणाला...

Mahayuti Mahavikas Aghadi Elections 2024 Result : महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात बडे नेते आमनेसामने उभे ठाकल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे.
Assembly Election
Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Top 25 Election Fights : विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला आहे. पुढील काही तासांत राज्यात सत्ता कुणाची याचे चित्र स्पष्ट होईल. पण त्याआधी राज्यातील बिग फाईट्स पाहुयात. या लढतींमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सत्तेचं वारं कुणीकडे फिरणार, हे या लढतींच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात हाय होल्टेज लढत बारामतीमध्ये होणार आहे. विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार विरुध्द पवार अशी लढत होत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचे आव्हान आहे.

Assembly Election
Baramati Voting Percentage : बारामतीत यंदा मतदानाचा टक्का वाढला; कुणाला होणार फायदा?

मुंबईत पहिल्यांदात दोन ठाकरे रिंगणात आहेत. वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि माहीमध्ये अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत. कुडाळ आणि कणवकली मतदारसंघात राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नितेश आणि निलेश राणेंसमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आव्हान आहे. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये नवाब मलिक उमेदवार असल्याने या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. (Mahayuti Vs Mahavikas Aghadi)

महाराष्ट्रातील टॉप 25 लढती

१.       बारामती – अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - युगेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी)

२.       वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना यूबीटी) – मिलिंद देवरा (शिवसेना) – संदीप देशपांडे (मनसे)

३.       माहीम – सदा सरवणकर (शिवसेना) – अमित ठाकरे (मनसे) – महेश सावंत (शिवसेना यूबीटी)

४.       कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी एसपी) – राम शिंदे (भाजप)

५.       कल्याण ग्रामीण - राजू पाटील (मनसे) - राजेश मोरे (शिवसेना) - सुभाष भोईर (शिवसेना यूबीटी)

६.       वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेस) – वरुण सरदेसाई (शिवसेना यूबीटी)

७.       साकोली - नाना पटोले (काँग्रेस) – अविनाश ब्राम्हणकर (भाजप)

८.       कुडाळ – निलेश राणे (शिवसेना) – वैभव नाईक (शिवसेना यूबीटी)

९.       इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी एसपी) – निशीकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

१०.    कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर (अपक्ष) – राजेश क्षीरसागर (शिवसेना)

Assembly Election
Sharad Pawar : 'वस्ताद'च ते ! वय 84; 64 दिवसांत 43 कार्यक्रम, 13 पत्रकार परिषदा अन् राज्यात 60 जाहीर सभा..!

११.    इंदापूर - दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस) – हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी एसपी)

१२.    सांगोला – शहाजीबाबू पाटील (शिवसेना) – दीपक साळुंखे (शिवसेना यूबीटी)

१३.    कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) – समरजीत घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी)

१४.    कवठेमहांकाळ – रोहित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी) – संजयकाका पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

१५.    परळी – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – राजेसाहेब (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी)

१६.    मानखुर्द शिवाजीनगर – अबु आझमी (समाजवादी पार्टी) - नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)

१७.    मुंब्रा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी) – नजीब मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस)

१८.    नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना) – संजय धात्रक (शिवसेना यूबीटी) – समीर भुजबळ (अपक्ष)

१९.    मावळ – सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) – बापू भेगडे (अपक्ष)

२०.    येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी एसपी)

२१.    कणकवली – नितेश राणे (भाजप) – संदेश पारकर (शिवसेना यूबीटी)

२२.    बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप) – संदीप नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी)

२३.    आंबेगाव – दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी)

२४.    लातूर – अमित देशमुख (काँग्रेस) – अर्चना पाटील चाकूरकर (भाजप)

२५.    काटोल – आशिष देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी) - चरणसिंह ठाकूर (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com