
Mumbai News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सोमवारी विक्रमी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. ते सादर करत असलेला हा 11 अर्थसंकल्प आहे. प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांनी महापुरूषांना अभिवादन केले. प्राप्तीकरात सुट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. तसेच पुढेही अशीच भक्कम साथ द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीवर करून देणारा आहे. त्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही अजितदादांनी यावेळी दिली. त्यानंतर त्यांनी तीन ओळींतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा आलो’ या डायलॉगची आठवण करून दिली. सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागतही केले.
अजितदादा म्हणाले, लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो... पुन्हा आलो... पुन्हा आलो, असे म्हणत अजित पवारांनी प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली. दादांच्या या डायलॉगबाजीला सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून प्रतिसाद दिला.
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, 2047 पर्यंत भारत विकसित देश व्हावा, असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र हे सुत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या शाश्वत विकासाचे काम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही.
त्याचप्रमाणे पाच वर्षांत 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे अजितदादांनी सांगितले. सूक्ष्म व लघु उद्योग धोरण जाहीर करणार, पर्यटनाला बंदर करातून सूट, 10 हजार महिलांना मायक्रोसॉफ्टमार्फत प्रशिक्षण, कौशल्य व रोजगारासाठी 807 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे अजितदादांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.