Maharashtra Cabinet expansion : विधान परिषदेच्या निकाल लागताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार? कोणाला लॉटरी लागणार?

Cabinet expansion Of Mahayuti Government : नुकताच विधान परिषदेचा निकाल समोर आला आहे. यात महायुतीने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठीची राजकीय गणितं डोक्यात ठेवून युतीतील वरिष्ठ योग्य त्या नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी देण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 July : शिंदे सरकारचा पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून त्यानुसार येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांना लॉटरी लागणार याबाबतची उत्सुकता आहे.

शिवाय या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon sessions) आधी देखील या चर्चांना उधाण आलं होतं. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. मात्र, आता पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, असं बोललं जात होतं. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तो न केल्याचं सांगितलं जात आहे.

नुकताच विधान परिषदेचा निकाल समोर आला आहे. यात महायुतीने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठीची राजकीय गणितं डोक्यात ठेवून महायुतीतील वरिष्ठ योग्य त्या नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी देण्याची शक्यता आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्यए सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांच्या (Ajit Pawar) गटातील नेत्यांना मोठ्याप्रमाणावर संधी देण्यात आली होती. त्यानंतर आणखी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र अद्याप काही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Pankaja Munde : 'यह सिर्फ झांकी है, आता विधानसभा बाकी'; पंकजा मुंडेंनी यशाचं गणित उलगडलं !

लोकसभा (Lok Sabha) निवडणुका त्यानंतर लगेच पावसाळी अधिवेशन आणि विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. शिवाय दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार असल्यामुळे आता काहीही करुनमंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर येत्या आठवड्यातच तो विस्तार होऊ शकतो असं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Sanjay Raut : 'त्या' आमदारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव, राऊत स्पष्टच बोलले...

त्यामुळे आता भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या विस्तारामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घटकपक्षांमधील नेत्यांमध्ये उत्साह निर्माण होईल यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com