Census 2027: शिक्षकांचे पुन्हा हाल सुरु होणार? परीक्षा काळात पडणार अतिरिक्त जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती

Maharashtra Education News: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी शिक्षकांसह पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या काळात अतिरिक्त जबाबदारी आल्यास अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Teacher prioritizes census work across the state.
Teacher prioritizes census work across the state.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Census 2027: राज्यात जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या तयारीला वेग आला असून या कामासाठी शिक्षकांसह अन्य विभागांतील पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मात्र, जनगणनेचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामकाजाचा कालावधी शालेय परीक्षांच्या काळात येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दहावी, बारावी तसेच इतर परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जनगणनेची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित यांचा समतोल कसा साधला जाणार, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आणि जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देताना गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासाठी संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून जनगणना चार्ज अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केल्यास अध्यापन, परीक्षांचे नियोजन, उत्तरपत्रिका तपासणी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. बैठकीत जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा, महत्त्वाचे निष्कर्ष आणि दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठीच्या नियोजनाची माहिती दिली.

Teacher prioritizes census work across the state.
UPI Payment: दुकानदारांना मोठा दिलासा! UPI पेमेंटसाठी MDR शुल्काला तात्पुरती स्थगिती; NPCIनं घेतला मोठा निर्णय

मार्च २०२७ पर्यंत विविध उपक्रमांचे नियोजन

राज्यात जनगणना २०२७ चा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणना मे-जून २०२६ दरम्यान पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, स्व-गणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे उपक्रम मार्च २०२७ पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याच कालावधीत विविध शालेय व मंडळांच्या परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षापूर्व तयारी आणि इतर शैक्षणिक कामेही सुरू असतात.

Teacher prioritizes census work across the state.
मतदार यादी कोण तयार करतं? BLO पासून मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या!

प्रशिक्षण आणि जनजागृतीवरही भर

स्थानिक पातळीवर जनजागृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःची आणि कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. महा रजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com