Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज नसते तर माझे नाव कलीमुद्दीन असते..! भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

BJP Leader Kailash Vijayvargiya Madhya Pradesh Politics : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मध्य प्रदेशातही उत्साहात साजरी करण्यात आली.
Kailash Vijayvargiya
Kailash VijayvargiyaSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. मध्य प्रदेशातही शिवजयंतीचा उत्साह होता. याप्रसंगी बोलताना भाजपचे बडे नेते व कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. शिवाजी महाराज नसते तर आपले नाव कैलाशऐवजी ‘कलीमुद्दीन’ झाले असते, असे विजयवर्गीय म्हणाले आहेत.  

शिवाजी महाराजांच्या योगदानावर बोलताना विजयवर्गीय यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराजांमुळे मालवा आणि जवळपासच्या भागात मुघलांना प्रवेश मिळाला नव्हता. त्यावेळी शिवाजी महाराज नसते तर आपले नाव कलीमुद्दीन झाले असते. शिवाजी महाराजांचे साहस आणि संघर्षामुळेच देशातील अनेक भागांमध्ये मुघलांचा हस्तक्षेप थांबला.

Kailash Vijayvargiya
K Chandrashekar Rao News : केसीआर यांच्याविरोधात कोर्टात गेलेल्या कार्यकर्त्याची हत्या; तेलंगणात खळबळ

विजयवर्गीय यांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच महाराजांचे आदर्शांचे पालन करण्याचे आवाहनही विजयवर्गीय यांनी उपस्थितांना केले. विजयवर्यीग यांनी सोशल मीडियातही शिवाजी महाराजांना अभिवादन करताना त्यांच्या शौर्याला नमन केले आहे.

विजयवर्गीय यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताच्या गौरवशाली अस्मितेचे प्रतिक, हिंदवी स्वराज्याचे निर्माते, अद्वितीय पराक्रम आणि शौर्याचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शत-शत नमन. आज या प्रसंगी इंदौरमध्ये काढण्यात आलेल्या वाहनांच्या भव्य रॅलीमध्ये सहभागी झाल्याचेही विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

Kailash Vijayvargiya
Rekha Gupta oath Ceremony : काँग्रेसच्या नेत्यानं रेखा गुप्ता यांच्यासोबत घेतली होती शपथ! फोटो होतोय व्हायरल...

आग्रा येथे स्मारक उभारणार – फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याची घोषणा केली आहे. ताजमहालपेक्षा हे स्मारक भव्य असेल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. या स्मारकासाठी आग्रा येथे जमीन देण्याचे आवाहनही त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com