Election Commission emblem misuse : भारत निवडणूक आयोगाचं चिन्ह वापरता..; राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची 'ही' सूचना लक्षात घ्या!

Maharashtra Chief Election Officer Prohibits Use of Election Commission Emblem and Government Buildings in Local Body Elections : संसदीय, विधानमंडळ तसेच राष्ट्रपती–उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे.
Election Commission emblem misuse
Election Commission emblem misuseSarkarnama
Published on
Updated on

Local body elections Maharashtra rules : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. दुसऱ्याच टप्प्यात २० डिसेंबरला मतदान होईल. यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका होतील.

पण या निवडणुका राज्य पातळीवर असून, केंद्रीय निवडणूक आयोगाचा याचा संबंध नाही. तरी देखील राज्यात या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे बोधचिन्हं, अधिकारी, इमारतीचा वापर प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. विशेष करून, समाज माध्यमांवर वापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतु असं करणं चुकीचं असल्याकडे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष वेधलं आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे समोर आली आहेत. यातून संभ्रम निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील (Maharashtra) मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, विधानमंडळ तसेच राष्ट्रपती–उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची (Election Commission) असून राज्यात या कामकाजासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम कार्यरत आहेत.

Election Commission emblem misuse
Property tax hike Ahilyanagar : बोगस सर्वेक्षण, 15 कोटींचे बिल थांबवा; ...तर आर्थिक शाखेकडे गुन्हा नोंदवणार, काँग्रेसच्या इशाऱ्यानं वातावरण तापलं!

दुसरीकडे, संविधानातील अनुच्छेद 243(K) व 243(ZA) नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचालन, निर्देशन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयुक्त पदावर निवृत्त प्रधान सचिव दिनेश वाघमारे कार्यरत आहेत.

Election Commission emblem misuse
Baby murder case : धक्कादायक! आईबापाचं निघाले वैरी; तीन महिन्यांच्या शिवांशचा मृतदेह काटेरी झुडुपात फेकला, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी मारेकरी गाठला

दोन्ही आयोगांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी व स्वतंत्र असल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांशी संबंधित बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह, अधिकारी, इमारती अथवा तत्सम दृश्यांचा वापर करणे चुकीचे असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

तसेच, राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेल्या अशा चुकांची तातडीने दुरुस्ती करून संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांतून हटवावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com