IAS Transfer : बदल्यांचा सपाटा! सांगलीच्या डॉ. राजा दयानिधींच्या जागी अशोक काकडे, काहीच दिवसांत 13 जणांच्या बदल्या

Maharashtra IAS Transfer : महायुती सरकारने बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला आहे. तर काहीच दिवसात बड्या 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
IAS Ashok kakade & kunal khemnar
IAS Ashok kakade & kunal khemnarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. मुख्यमंत्री पद आपल्याकडे घेताच फडणवीस यांनी प्रशासनावर पकड घेतली आहे. 2 जानेवारी 2025 रोजी फडणवीस यांनी 10 अधिकाऱ्यांच्या आदेश काढले होते. यानंतर आज (ता.11) त्यांनी आणखी 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांचाही समावेश असून सांगलीची जबाबदारी सारथीचे व्यवस्थापक संचालक अशोक काकडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असून प्रशासनात देखील मोठे फेरबदल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदल्या केल्या होत्या. त्यापाठोपाठ 4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तर आज चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून मागच्या 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

यांच्या झाल्या बदल्या

1) डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे.

2) डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

3) अशोक काकडे एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे.

4) अनमोल सागर सीईओ झेडपी लातूर यांची बदली मनपा आयुक्त भिवंडी निजामपूर बहुविध महामंडळात करण्यात आली आहे.

IAS Ashok kakade & kunal khemnar
IAS Officers Transfer : राहुल कर्डिले यांच्याकडे आता नांदेडमध्ये मोठी जबाबदारी; राज्यात 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

1) प्रवीण दराडे प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

2) पंकज कुमार यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3) नितीन पाटील सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Ashok kakade & kunal khemnar
IAS Transfers : बदल्यांचे सत्र सुरूच! राज्यातील 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी

4) श्वेता सिंघल महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव यांची अमरावती विभागातील विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5) डॉ. प्रशांत नारनवरे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव, मलबार हिल, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6) अनिल भंडारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांना संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7) पी.के. डांगे आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

8) एस. रामामूर्ती सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे उपसचिव, मलबार हिल, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.

9) अभिजित राऊत जिल्हाधिकारी, नांदेड यांना सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

10) मिलिंद कुमार साळवे सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Ashok kakade & kunal khemnar
IAS Officers Transfer: महायुती सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; आता 'या' सात आयएएस अधिकाऱ्यांच्या 'ट्रान्सफर'

11) राहुल कर्डिले सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12) माधवी सरदेशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांना संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

13) अमित रंजन सहाय्यक जिल्हाधिकारी, चार्मोशी उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com