IAS Officers Transfer : राहुल कर्डिले यांच्याकडे आता नांदेडमध्ये मोठी जबाबदारी; राज्यात 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Rahul Kardile Transfer News : राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणं हे आता सामान्य झालं आहे. त्याप्रमाणेच आता महायुती (Mahayuti) सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
IAS Rahul Kardile
IAS Rahul KardileSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Jan : राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणं हे आता सामान्य झालं आहे. त्याप्रमाणेच आता महायुती (Mahayuti) सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण नुकतंच सरकारकडून 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

मात्र, यामध्ये IAS राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण महिनाभरापू्र्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या कर्डिले यांच्याकडे आता पुन्हा नांदेडचे (Nanded) जिल्हाधिकारी पदाचा कारभार देण्यात आला आहे.

IAS Rahul Kardile
Santosh Deshmukh Case : "जरांगेंच्या नादाला लागू नका, अन्यथा..."; लक्ष्मण हाकेंचा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती. ट्रेनी आयएएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलं होतं.

त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. नंतरच्या काळात त्यांची MMRDA च्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर नुकतंच महिनाभरापू्र्वी त्यांची सिडकोच्या (CIDCO) सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे नांदेडच्या जिल्हाधिकारीपदाचा कारभार देण्यात आला आहे.

IAS Rahul Kardile
BJP News : सीएम फडणवीसांची 'मास्टर' खेळी; अजितदादा अन् शिंदेंच्या पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा

सरकारने बदली केलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे

प्रवीण दराडे, पंकज कुमार, नितीन पाटील, श्वेता सिंघल, डॉ. प्रशांत नारनवरे, अनिल भंडारी, पी.के. डांगे, एस. रामामूर्ती, अभिजित राऊत, मिलिंद कुमार साळवे, राहुल कर्डिले, माधवी सरदेशमुख, अमित रंजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com