Maharashtra Government Decision : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत बदल; निधीतही बदल

Maharashtra CM Medical Assistance Cell : राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल करण्यात आला असून आता प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली जाणार आहे.
Maharashtra CM Relief Fund
Maharashtra CM Relief Fundsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली असून रुग्णालयांनाच अर्ज अपलोड करावा लागणार आहे.

  2. अर्ज केल्यानंतर 3 ते 8 तासांत मदतीचा निर्णय कळवला जाणार आहे, ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

  3. मंजूर रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार असून सुरुवातीला 30% आणि उर्वरित रक्कम डिस्चार्जवेळी दिली जाईल.

Mumbai News : सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात येणार आहे. यामुळे सहाय्यता निधीच्या कार्यपद्धती आता पूर्णपणे ऑनलाइन होणार असून सर्व कागदपत्रे आणि निर्णय घेण्याची प्रक्रियाही ऑनलाइन असणार आहे. यामुळे रूग्णांना दिलासा मिळणार असून मुंबईत मंत्रालयाच्या फेऱ्या वाचणार असून चकरा मारण्याची गरज भासणार नाही.

तर अर्ज अपलोड केल्यानंतर 3 ते 8 कार्यालयीन तासांच्या आत मदतीचा निर्णय रुग्णालय आणि नातेवाईकांना कळवला जाईल. तसेच सुरुवातीला 30% रक्कम आणि उर्वरित रक्कम रुग्णाला डिस्चार्ज मिळताना दिली जाईल, अशी देखील माहिती आहे. तर या नवीन डिजिटल प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल करण्यात आला असून आता अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यामुळे, दि. 7 एप्रिल 2026 पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर आता यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. यामुळे आता रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागणार नाही. तर आता हे काम रुग्णालयांनी करायचे आहे.

Maharashtra CM Relief Fund
Devendra Fadnavis : नाशिकमध्ये आयटी कंपनीच्या आडून धर्मांतराचे रॅकेट ; CM फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले..

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी संबंधित रुग्णालयांनाच रुग्णाची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत. यासाठी प्रत्येक रुग्णालयाला तशी तरतूद करावी लागणार आहे. रुग्णालयाने आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर E-KYC प्रक्रिया पूर्ण करून तेथूनच अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.

रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यानंतर ते रूग्णालयाने आपल्या अधिकृत ई-मेल आयडीवरून पुढे पाठवायचा आहे. यानंतर अर्ज अपलोड केल्यानंतर कार्यालयीन 3 ते 8 तासातच याबाबत निर्णय होणार आहे. तर कागदपत्रे उशिरा अपलोड झाल्यास दुसऱ्या दिवशी कार्यालयीन वेळेत याबाबत निर्णय होईल. तसेच मंजूर झालेली पूर्ण रक्कम एकाच वेळी न देता, सुरुवातीला 30% रक्कम आणि उर्वरित रक्कम रुग्णाला डिस्चार्ज मिळताना दिली जाईल, अशी देखील माहिती आहे.

सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी संबंधितांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच सर्वसामान्य रुग्णांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ आणि सुलभ पद्धतीने मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जो लोकाभिमुख असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असल्याचीही प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री सहायता निधीतून 2025 मध्ये 40,776 रुग्णांना सुमारे 333.6 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर आता सरकारचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या माध्यमातून ही मदत आणखी वाढवण्याचा प्रयत्न असून कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी देखील निधी उभारला जात आहे. यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि 'भारत पेट्रोलियम' (BPCL) सोबत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.

Maharashtra CM Relief Fund
Devendra Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार, देवेंद्र फडणवीस थेट बोलले, 'त्यांनी सुनेत्रावहिनींना...'

FAQs :

1. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया कशी बदलली आहे?
आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

2. अर्ज कोण करणार आहे?
रुग्णालय संबंधित रुग्णाची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणार आहे.

3. निर्णय किती वेळात मिळेल?
3 ते 8 कार्यालयीन तासांत निर्णय दिला जाईल.

4. रक्कम कशी दिली जाईल?
सुरुवातीला 30% आणि उर्वरित रक्कम डिस्चार्जवेळी दिली जाईल.

5. या बदलाचा फायदा कोणाला होईल?
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रक्रिया सोपी आणि जलद होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com