Devendra Fadnavis : नाशिकमध्ये आयटी कंपनीच्या आडून धर्मांतराचे रॅकेट ; CM फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले..

Nashik IT Company exploitation case : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत हिंदू महिलांना व मुलींना टार्गेट करुन त्यांच्यावर अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहा संशयितांना अटक केली आहे.
Devendra Fadnavis On Nashik IT Company exploitation case
Devendra Fadnavis On Nashik IT Company exploitation case Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : नाशिकमधील अशोक खरात व रविंद्र एरंडे यांचे महिला लैगिंक शोषणाचे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. येथील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणींचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दोन पोलिस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहा संशयितांना गजाआड करण्यात आले आहे. याप्रकरणावर आता CM देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आणि गंभीर असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण केवळ एका कंपनीपुरते मर्यादीत नसून या मागे एखादे संघटित 'जिहादी रॅकेट' असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे.

काय म्हणाले CM फडणवीस?

या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. एका आयटी कंपनीमध्ये अशा प्रकारे दबाव आणून धर्मांतर आणि महिलांचे लैंगिक शोषण केले गेले हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांचे कौतुक करेन की त्यांनी अतिशय वेगाने कारवाई करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

Devendra Fadnavis On Nashik IT Company exploitation case
Gopichand Padalkar : अशोक खरात, रवींद्र एरंडे प्रकरणात शांत राहिलेल्या पडळकरांची 'तिसऱ्या' प्रकरणात एन्ट्री, CM' ची घेणार भेट

अत्याचारांसह धर्मांतराचा डाव

नाशिक शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीत विशिष्ट समाजाच्या संशयितांकडून हिंदू कर्मचारी महिला व मुलींना लक्ष्य करीत एकीवर सतत पाच वर्षे अत्याचारांसह तिच्या धर्मांतरांचा प्रयत्न करण्यात आला. अन्य पीडितांचा विनयभंग करीत त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

लैगिंक शोषणासोबतच धर्मांतर घडवून आणण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. बेरोजगार व गरजू हिंदू तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना कंपनीत भरती केले जात असे. त्यानंतर 'टीम लीडर्स' व कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. त्यांच्यावर धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता.

तरुणाचेही धर्मांतर

सातारा येथून नोकरीनिमित्त सदर कंपनीत आलेल्या युवकाला या संशयित टोळीने हेरले. त्याला देखील विशिष्ट धर्माचे अनुकरण करण्यास भाग पाडून नमाज व कलमा पढण्यासही भाग पाडले. एवढेच नव्हे, तर त्यास बळजबरीने मांसाहार करावयासही भाग पाडले. रमजान महिन्यात रोजाही धरण्यास लावले.

Devendra Fadnavis On Nashik IT Company exploitation case
Nashik Crime : तोतया पोलिसाचे कांड पाहून खरे पोलिस चक्रावले, प्रकार तोच महिलांना जाळ्यात ओढणं.. नाशिक पुन्हा हादरलं

यांना केली अटक

दरम्यान या प्रकरणातील संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख या सहा संशयितांना अटक करण्यात आली असून, निदा खान पसार असून, तिचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com