Cooperative Polls : सहकारी संस्थाच्या निवडणुका लांबणीवर; ‘या’ जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने काढला आदेश

Maharashtra Elections Delay | Cooperative Polls Postponed : उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होत असलेल्या संस्थांना यातून सूट देण्यात आली आहे.
Cooperative Election
Cooperative ElectionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government GR : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या पोटनिवडणुकीमुळे या दोन जिल्ह्यांतील सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा आदेश काढला आहे. पोटनिवडणुकीमुळे संबंधित प्रशासकीय व पोलीस यंत्रणा व्यस्त राहणार असल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रांची उपलब्धता याबाबतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे विभागाने म्हटले आहे.

सरकारच्या आदेशानुसार, ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या आदेशाच्या दिनांकापासून सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३१ मे २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. या आदेशातून काही संस्थांच्या निवडणुका वगळण्यात आल्या आहेत.

Cooperative Election
US Strike : मोठी बातमी : भारताकडे उड्डाण करण्याआधीच अमेरिकेकडून इराणी विमानावर एअरस्ट्राईक

उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होत असलेल्या संस्थांना यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अशा संस्थांच्या निवडणुका पार पडतील. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, अन्य पदाधिकारी यांनी पदाचा राजीनामा देणे किंवा मृत्यू, अपात्रता या कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांची निवड करणे, या बाबींना सूट देण्यात आली आहे.

Cooperative Election
Sahakar Awards : सहकार पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ; 13 वर्षांनंतर राज्य सरकारने केली सुधारणा

त्याचप्रमाणे राजीनामा, मृत्यू किंवा अपात्रतेमुळे संचालक मंडळातील नैमित्तीकरित्या रिक्त झालेल्या जागेवर अन्य संचालकाची निवड करणे, क व ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया आणि ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झाला आहे अशा सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाही सूट देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com