Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये महायुतीची प्रचारसभा धुळ्यामध्ये झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्रच्या समोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र,आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कुठेही उल्लेख केला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि महायुती सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती देत काँग्रेसपेक्षा आपले सरकार शेतकऱ्यांसाठी कसे मेहनत आहे,यावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डबल इंजिन सरकारमध्ये डबल फायदा भेटला आहे. त्यांना पीएम किसान सन्मान योजनेतून सहा रुपये मिळतात. महायुती सरकारचे नमो शेतकरी सन्मान योजनेतून सहा हजार रुपये अतिरिक्त मिळतात. म्हणजे 12 हजारांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना सरळ खात्यात मिळते आहे.
पंतप्रधान मोदींनी दावा केला ही शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही महायुती सरकार आत्ता 15 हजार रुपयांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
केंद्र सरकारने 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यामुळे काँग्रेसने खोदलेले खड्डे बुजवण्यास मदत झाली. सरकारने शेतकऱ्यांच्या पीकाला वीमा दिला आहे. स्वस्थ सोलर वीजपंप, धान्य खरेदीचे रेकाॅर्ड झाले, एमएसपीची रक्कम वाढवली जात आहे.हाच बीजेपी, महायुतीचा संकल्प आहे. शेतकरी खुशाल तर देश समृद्ध बनेल, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीच्या वेळी वाढवण बंदराच्या येथे विमानतळ उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. महायुतीचे सरकार येईल तेव्हा त्यांच्यासोबत बैठक घेईन विमानतळ उभारण्याचे त्यांची ती इच्छा पूर्ण करेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एमएसपीपेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला तर भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. तुमच्या आशीर्वादाने सरकार आले की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.