Maharashtra Drought News : महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; तुमचा तालुका यादीत आहे का? जिल्हानिहाय संपूर्ण यादी

Maharashtra Drought News : महाराष्ट्रातील खरीप हंगामात पावसाची तूट आणि पीक नुकसानीमुळे 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा Trigger-1 लागू करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra Drought 2026 | 265 Talukas Trigger-1
Maharashtra Drought 2026 | 265 Talukas Trigger-1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्रातील खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. कृषी आयुक्तांच्या 24 सप्टेंबरच्या अहवालाच्या आधारे शासनाने या तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार 25 सप्टेंबर 2026 रोजी मदत व पुनर्वसन विभागाने यासंबंधिचा शासन निर्णय काढला आहे.

या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा, चारा आणि अन्नधान्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती तालुके?

कोकण विभाग

ठाणे — एकही तालुका नाही

पालघर — एकही तालुका नाही

रायगड — 1 तालुका
श्रीवर्धन

रत्नागिरी — 3 तालुके
रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर

सिंधुदुर्ग — 8 तालुके
सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला

नाशिक विभाग

नाशिक — 10 तालुके
मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा

धुळे — 4 तालुके
धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर

जळगाव — 15 तालुके
एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, धरणगाव

नंदुरबार — 6 तालुके
अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी

अहिल्यानगर — 14 तालुके
नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता

पुणे विभाग

पुणे — 8 तालुके
भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर

सोलापूर — 11 तालुके
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा

सांगली — 4 तालुके
मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ

सातारा — 6 तालुके
सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर

कोल्हापूर — 6 तालुके
पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड

छत्रपती संभाजीनगर विभाग

छत्रपती संभाजीनगर — 9 तालुके
छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री

जालना — 8 तालुके
बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद

बीड — 11 तालुके
बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी

लातूर — 10 तालुके
लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, देवणी, जळकोट

धाराशिव — 8 तालुके
धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा

नांदेड — 14 तालुके
नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव

परभणी — 9 तालुके
पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी

हिंगोली — 5 तालुके
हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

अमरावती विभाग

बुलढाणा — 13 तालुके
जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा

अमरावती — 14 तालुके
अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर

अकोला — 7 तालुके
अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी

वाशिम — 6 तालुके
वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा

यवतमाळ — 16 तालुके
यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव

नागपूर विभाग

वर्धा — 7 तालुके
वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी

नागपूर — 14 तालुके
नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर

भंडारा — 3 तालुके
भंडारा, पवनी, लाखांदूर

गोंदिया — 1 तालुका
तिरोडा

चंद्रपूर — 12 तालुके
चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा

गडचिरोली — 2 तालुके
गडचिरोली, चामोर्शी

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर काय मिळणार?

सरकारने 265 तालुक्यांसाठी एकूण 12 प्रकारच्या उपाययोजना आणि सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामांच्या निकषात शिथिलता, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, अन्नधान्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि जलसंधारणाची कामे यांचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे या 265 तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची आर्थिक मदत अद्याप या निर्णयातून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यासाठी विहीत कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णय काढला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

265 तालुक्यांमध्ये पंचनामे तातडीने

Trigger-1 लागू झालेल्या 265 तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, तसेच सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS coordinates संकलित करून अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता दुष्काळ जाहीर झालेल्या या 265 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनामे कधी पूर्ण होतात, पीक नुकसानीच्या मदतीचा स्वतंत्र निर्णय कधी होतो आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com