Drought Relief: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव; कृषी नुकसान भरपाईसाठी १५ हजार ३८६ कोटींची मागणी

Maharashtra Drought Relief: महाराष्ट्रातील दुष्काळामुळे १४१.५३ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यांतून समोर आले आहे. कृषी विभागाने १५,३८६ कोटींच्या मदतीची मागणी केली आहे.
Maharashtra Drought
Maharashtra DroughtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Government News: राज्यातील भीषण दुष्काळामुळे तब्बल १ कोटी ४१ लाख ५३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. शेतीचे सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या नुकसानीपोटी कृषी विभागाने १५,३८६ कोटी १९ लाख रुपयांची मागणी केली आहे. याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या मागणीसह राज्याने केंद्राकडे एकूण सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या मदतनिधीचा प्रस्ताव शनिवारी (ता.३१) सादर केला आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्या शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, ते शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार असून, राज्यात दुष्काळामुळे १४१.५३ लाख हेक्टर एवढे प्रचंड क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी राज्याच्या कृषी विभागाने १५,३८६ कोटी १९ लाख रुपयांची मागणी केली आहे.

या दुष्काळग्रस्त क्षेत्रांत पिकांनुसार मदतीचे वर्गीकरण करण्यात आले असून, जिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी मदतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये मदत दर ठरवण्यात आला असून, १०६.५४ लाख हेक्टर

क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी एकूण ९,०५६.३७ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर १७,००० रुपये मदत दर असून, २८.०५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या क्षेत्रासाठी एकूण ४,७६८.६२ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

Maharashtra Drought
Jalgaon Crime News : वाळू माफियांविरोधात साक्ष दिली, शेतकऱ्याचा काटा काढला, डंपरखाली चिरडून हत्या

बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २२,५०० रुपये मदत दर ठरविण्यात आला असून, ६.९४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याद्वारे एकूण १,५६१.२० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. एकूण १४१.५३ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी कृषी विभागाने १५,३८६.१९ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

Maharashtra Drought
Sangli DCC Bank Election: सांगली जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री रोखण्यात जयंत पाटलांना यश येणार? ३ नोव्हेंबरला ठरणार राजकीय प्रतिष्ठा!

वर्गीकरण -

बाधित क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)

१०६.५४

जिरायती

२८.०५

बागायती

६.९४

बहुवार्षिक पिके

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.