Sangli DCC Bank Election: सांगली जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री रोखण्यात जयंत पाटलांना यश येणार? ३ नोव्हेंबरला ठरणार राजकीय प्रतिष्ठा!

Sangli DCC Bank Election Result Update 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्या असून जत सोसायटी गटातील लढत लक्षवेधी ठरली आहे. ३ नोव्हेंबरला गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्या लढतीचा निकाल लागणार आहे.
Sangli DCC Bank Election
Sangli DCC Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli DCC Bank Election Result 2026: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध झाल्याने सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, जत सोसायटी गटातील निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरली आहे. या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पडळकर यांना जिल्हा बँकेत प्रवेश मिळू नये, यासाठी जयंत पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरणार की पडळकर ही खेळी मोडून काढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याची भूमिका घेतली. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेत २१ पैकी १५ जागा बिनविरोध करण्यात आल्या. मात्र, या बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांना जत सोसायटी गटातून निवडणूक लढवावी लागली.

२१ पैकी १५ जागा बिनविरोध; सर्वपक्षीय समीकरण

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये पक्षनिहाय बलाबल पुढीलप्रमाणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष – ४

भाजप – ४

काँग्रेस – ४

शिवसेना – ३

Sangli DCC Bank Election
Sting Operation news : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात शिजला स्टिंग ऑपरेशनचा प्लॅन? पोलिसांनी उडवून दिली खळबळ

उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामुळे बिनविरोध निवडीच्या माध्यमातून जिल्हा बँकेत सर्वपक्षीय सत्तेचे समीकरण तयार झाले आहे. मात्र, जत सोसायटी गटातील लढतीमुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे.

जयंत पाटील विरुद्ध पडळकर; जत सोसायटी गटात प्रतिष्ठेची लढत

जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष सांगली जिल्ह्याला नवा नाही. गेल्या दहा वर्षांपासून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेतील सत्तेची सूत्रे राहिली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पडळकर यांना जिल्हा बँकेत प्रवेश मिळणार की नाही, याबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती.

जत सोसायटी गटात पडळकर यांच्याविरोधात विनोद पवार निवडणूक लढवत आहेत. मात्र पडळकरांच्या विरोधातील महाविकास आघाडीतील नेत्यांना माघार घेण्यास सांगून विनोद पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या लढतीत पडळकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.

पडळकरांची एन्ट्री रोखण्याची जयंत पाटलांची रणनीती?

दुष्काळाच्या मुद्द्यावर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधत १५ जागा बिनविरोध करण्याचे गणित जुळवण्यात आले. या प्रक्रियेत भाजपलाही सोबत घेण्यात आले; मात्र पडळकर यांना बिनविरोध निवडीच्या समीकरणातून बाहेर ठेवण्यात आल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा अधिक रंगली.

Sangli DCC Bank Election
Maharashtra Politics News : धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांची मंत्रिमंडळात एन्ट्री होणार? दिल्लीतील भेटीनंतर जोरदार चर्चा

आता जत सोसायटी गटातील निकालातून पडळकर यांची जिल्हा बँकेत एन्ट्री होणार की त्यांना रोखण्याची जयंत पाटील यांची रणनीती यशस्वी ठरणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ३ नोव्हेंबरचा निकाल सांगली जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.