Drought News: खळबळजनक! दुष्काळ निवारणाच्या बैठकीतच आकडेवारीचा घोळ, उपसमितीसमोरच अधिकाऱ्यांकडून चुकीची आकडेवारी

Maharashtra Dry Drought: राज्यातील २६५ तालुक्यांव्यतिरिक्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या आणखी ४३ तालुक्यांचा शासन आदेश अद्याप निघालेला नसल्याचे समोर आले आहे. तसेच मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या १९ तालुक्यांचाही शासन आदेश अद्याप जारी झालेला नाही.
Drought News
Drought News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought News: दुष्काळ निवारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतच पीक कर्जवाटपाबाबत विसंगत आकडेवारी सादर झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी उद्दिष्टाच्या सुमारे ७४ टक्के पीककर्जाचे वाटप केले असताना उपसमितीसमोर केवळ ८ टक्के कर्जवाटप झाल्याची माहिती सादर करण्यात आली. त्यामुळे दुष्काळ निवारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेणाऱ्या समितीसमोर नेमकी कोणती माहिती ठेवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंगळवारी (६ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत पीक कर्जवाटपाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बँकांनी केलेल्या कर्जवाटपाची आकडेवारी सादर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी उद्दिष्टाच्या ७४ टक्के कर्जवाटप केले असताना बैठकीत केवळ ८ टक्के कर्जवाटप झाल्याची माहिती देण्यात आल्याचे समोर आले.

महत्त्वाची बाब म्हणजे पीक कर्जवाटपाची अधिकृत आणि अद्ययावत माहिती सहकार विभागाकडून घेऊन ती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करणे अपेक्षित होते. मात्र, उपलब्ध माहितीनुसार सहकार विभागाकडून माहिती घेण्याऐवजी ऐकीव माहितीच्या आधारे बैठकीत आकडेवारी मांडण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेणाऱ्या उपसमितीसमोरच माहितीच्या अचूकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

१९ हजार कोटींच्या मदतीची मागणी...

राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून कृषी विभागाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वित्त विभागाकडे तब्बल १९ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यापैकी दुष्काळ मदतीसाठी १४ हजार कोटी, तर जलसंधारण आणि रोजगारासाठी ५ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Drought News
Maharashtra Drought News: फडणवीस-शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला पहिलं मोठं यश, दुष्काळग्रस्त भागांची पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल

दुष्काळ जाहीर; पण आदेश कुठे?

दरम्यान, राज्यातील २६५ तालुक्यांव्यतिरिक्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या आणखी ४३ तालुक्यांचा शासन आदेश अद्याप निघालेला नसल्याचे समोर आले आहे. तसेच मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या १९ तालुक्यांचाही शासन आदेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना नेमक्या कशा पद्धतीने लागू होणार, याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com