Dry Day : संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी 'ड्राय डे'; दारूची दुकाने अन् बार राहणार बंद?

Liquor shops closed in Maharashtra : महाराष्ट्रात शनिवारी ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. यामुळे दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. यामागील कारण, नियम आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या.
Dry Days in Maharashtra
Dry Days in Maharashtra Sarkarnama
Published on
Updated on

विकेंडला पार्टी किंवा बाहेर फिरण्याचा बेत आखत असाल, तर ही माहिती आधी जाणून घ्या. शनिवार, 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे पाळला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, पब आणि मद्यविक्रीची परवानाधारक आस्थापने दिवसभर बंद राहतील. त्यामुळे मद्य खरेदी किंवा पार्टीचे नियोजन करणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. या दिवशी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पासी चालत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. राज्यभरात मंदिरांमध्ये विशेष पूजा, अभिषेक, भजन कीर्तन, सप्ताह अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे.

Dry Days in Maharashtra
Delhi Police : दिल्लीत पहिल्यांदाच असा कायदा लागू, पोलिस आयुक्तांना कुणालाही ताब्यात घेण्याचे अधिकार; 12 महिन्यांपर्यंत पोलीस कोठडीत ठेवता येणार

या दिवशी भाविक भगवान विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा करतात. तुळशीची पाने अर्पण करणे, विष्णू सहस्रनामाचे पठण, हरिपाठ, भजन-कीर्तन तसेच धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्याची परंपरा आहे. अनेकजण दिवसभर उपवास करून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास या चार महिन्यांच्या पवित्र कालखंडालाही प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, "शनिवारी, 25 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील दारूची सर्व दुकाने, बार, पब दिवसभर बंद राहणार आहेत." त्यामुळे नागरिकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी मद्यविक्री बंद राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com