Loan Waiver : सरकारचा वादा फसला, 30 जून पूर्वी कर्जमाफी नाहीच; कृषिमंत्र्यांकडून 'नव्या तारखे'ची घोषणा; शेतकऱ्यांची घोर निराशा

Maharashtra Farmer Loan Waiver 2026 : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची डेडलाईन हुकली असून आता ती पुढे गेल्याचे समोर आले आहे. तर याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेत माहिती दिली.
Maharashtra Farmer Loan Waiver; cm devendra fadnavis And Dattatray Bharne
Maharashtra Farmer Loan Waiver; cm devendra fadnavis And Dattatray Bharnesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farmer Loan Waiver Latest News : राज्यातील संकंटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्पावेळी केली होती. यावेळी त्यांनी या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव दिले होते. तसेच ३० जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.

मात्र आता राज्यपालांच्या सहीचे कारण देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेळ लागणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना ५ जुलैपासून मिळेल अशाही महत्वपूर्ण महितीही त्यांनी यावेळी दिली आहे. यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना आणखी पाच ते सहा दिवस वाट पाहावी लागणार आहे.

कृषी समृद्धी योजनेसाठी निधी दिला जात नसल्याचा मुद्दा भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्थसंकल्पातच तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यात देखील आणखी ३ हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver; cm devendra fadnavis And Dattatray Bharne
Loan Waiver : तुम्हाला 25 हजारांपेक्षा जास्त पगार आहे? मग तुम्ही कर्जमाफी विसरा...

तसेच कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यावर स्वाक्षरी झाल्यावर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ हा ५ जुलैपासून मिळेल असेही भरणे यांनी विधानसभेत जाहीर केले. यामुळे एकीकडे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागमार असून जूनअखेर कर्जमाफी देण्याचा सरकारचा वादा फसल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

दरम्यान आता जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या प्राथमिक अंदाजानुसार ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची रक्कम त्यासाठी लागणार आहे. तर योजनेतील अटी, सुधारणावरून सरकारला विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर त्यात बदल करण्यासंदर्भात उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितल्याचे आठवण भरणे यांनी आपल्या उत्तर सांगितले. आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी असून विरोधकांकडून भ्रम निर्माण केले जात आहे. आम्ही देखील शेतकऱ्याची लेकरं आहोत, आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे असे म्हणत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देताना कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी म्हटलं आहे.

सरकारचं तारीख पे तारीखचं टाईमपास...

सरकारच्या चाल ढकलमुळे शेतकरी अडचणीत येत असल्याचे सध्याचे चित्र आहे यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा जोरदार निशना साधला आहे. त्यांनी कर्जमाफीवरुन सरकारचं टाईमपास सुरु असून पुढची तारीख सांगितली जातेय. याचा अर्थ तारीख पे तारीख असं नाटक सरकारचं सुरु आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver; cm devendra fadnavis And Dattatray Bharne
Farmer Loan Waiver Conditions : शेतकरी कर्जमाफीत अट का ठेवली? मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

राज्यपालांकडे जायचं कारण नव्हतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी पैशांची तरतूद करत आहोत, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण आता सरकारकडे पैसा नाहीये, तरतूद केलेल्या पैशांचा वापर दुसरीकडे केला जात असल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे. तर सरकारनं प्रामाणिक पणानं कर्जमाफी करणार की नाही हे सांगावं असं आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com