Loan Waiver : तुम्हाला 25 हजारांपेक्षा जास्त पगार आहे? मग तुम्ही कर्जमाफी विसरा...

Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि काही वेतनधारकांना लाभ मिळणार नाही.
Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme
Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 June : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना अटी व निकष लावले आहेत. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि २५ हजारांपेक्षा अधिक मासिक वेतन वा निवृत्तीवेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही, असा निकष असणार आहे.

दरम्यान राज्य सरकारने मागवलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ६८ जिल्हा परिषद व १३६ पंचायत समिती सदस्यांसह १५ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. याबाबतची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून राज्य सरकारला सादर करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. हा लाभ देताना केवळ गरजू व पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. सरकारने लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचाऱ्यांना यातून वगळले आहे. अपात्र व्यक्तींची अचूक माहिती मिळविण्यासाठी ९ जून रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पाठवलेल्या पत्रानुसार माहिती संकलित केली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह २५ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन वा निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मागवण्यात आली आहे. यामध्ये २५ हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे ९ ते ९५०० कर्मचारी, तर ४ हजारहून अधिक २५ हजार रुपयांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन घेणारे कर्मचारी आहेत. २५ हजारांहून अधिक मासिक वेतन आणि निवृत्तीवेतन घेणारे १४ हजारहून अधिक कर्मचारी या कर्जमाफीस अपात्र ठरणार आहेत.

Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme
Pavanraje Murder Case : निंबाळकर खून खटला निकालानंतर राणाजगजितसिंह पाटलांची मोठी मागणी; षडयंत्राची बरीच माहिती माझ्याकडे...

सर्वच शिक्षक अपात्र ठरणार

कर्जमाफीसाठी १४ हजारहून अधिक कर्मचारी अपात्र ठरले असून, यापैकी निम्याहून अधिक शिक्षकांचा समावेश आहे. अशीच स्थिती निवृत्त शिक्षकांच्या बाबत आहे. सेवेत असलेले ८ हजार ३०० शिक्षक असून, सर्व शिक्षकांना २५ हजारांपेक्षा अधिक वेतन असल्याने ते कर्जमाफीस अपात्र ठरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ५ हजार कर्मचारीही योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.

Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme
Rana Patil on Nimbalkar Murder Case : निकालानंतर राणा पाटलांचं सूचक विधान : हे धाराशिवचे राजकारण नव्हतं, तर महाराष्ट्राचं राजकारण होतं, योग्यवेळी सगळं सांगेन...

कर्मचाऱ्यांचे नाव, आधार क्रमांक मागवला

कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व एकूण वेतन अशी माहिती मागवण्यात आली आहे, तर जिल्हा परिषद सदस्यांचे नाव, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक ही माहिती मागवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com