
राज्य सरकारने शिष्यवृत्ती परीक्षेचा वर्ग बदलण्याचा निर्णय घेतला असून आता ती चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.
आधी ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या वयानुसार पात्रता आणि अभ्यासक्रमात बदल होणार आहेत.
Mumbai News : राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पुढील वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा ही पाचवी आणि आठवी ऐवजी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना लागू असेल. यामुळे यंदा यंदाच्या वर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर 2026 मध्ये पूर्वीप्रमाणे चौथी आणि सातवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजित केले जाणार आहे.
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी प्रमाणे यात बदल करण्यात आला. 2016-17 पासून ती पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली.
मात्र वर्गात बदल केल्यानंतर गेल्या नऊ वर्षात सतत या परीक्षेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाचा अद्याप शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. यामुळे शिक्षक, पालकांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला होता.
पण आता शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला असून शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी ऐवजी आता चौथी आणि सातवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली आहे. या बदलाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून होणार आहे. तर यंदा दोन टर्ममध्ये ही परीक्षा घेतली जाणार असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. तर एप्रिल-मे मध्ये चौथी आणि सातवीसाठी कोणत्याही रविवारी होईल. दरम्यान चौथी आणि पाचवीसाठी 16 हजार 693, तर सातवी आणि आठवीसाठी 16 हजार 588 शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आले आहेत.
नव्या निर्णायत आणखी एक बदल करण्यात आला असून आता येथून पुढे पास नापास ऐवजी पात्र किंवा अपात्र असे घोषित केलं जाणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 200 रुपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 125 रुपये शुल्क असेल. तर शाळांनाही प्रतिवर्षी 200 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
चौथीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी वार्षिक पाच हजार रुपये, तर सातवीच्या शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी 7 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. चौथीच्या विद्यार्थ्याचे कमाल वय 10 वर्षे तर सातवीच्या विद्यार्थ्याचे कमाल वय १३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली असून चौथीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 13 आणि सातवीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 17 वर्षे कमाल वय निश्चित करण्यात आले आहे.
1. शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या वर्गांसाठी घेण्यात येणार आहे?
आता ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे.
2. आधी कोणत्या वर्गांसाठी ही परीक्षा घेतली जात होती?
पूर्वी ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती.
3. या निर्णयामागे कारण काय आहे?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन लवकर करणे आणि त्यांच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
4. नवीन परीक्षा पद्धत कधी लागू होईल?
ही नवीन पद्धत पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे.
5. पालकांनी काय तयारी करावी?
पालकांनी चौथी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती अभ्यासक्रम व तयारी सुरू करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.