Opposition criticism : पळून जाण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही; सीएम फडणवीसांची विरोधकांवर टीका

Political statement by Fadnavis News : शनिवार, रविवारीदेखील अधिवेशन होणार आहे. पळून जाण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही, असे स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
Devendra Fadnavis
devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आम्ही समर्पक उत्तर देऊ. उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. अधिवेशनाचा कालावधी खूपच कमी आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. परंतु शनिवार, रविवारीदेखील अधिवेशन होणार आहे. पळून जाण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही, असे स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

कोणावरच आता विरोधकांचा विश्वास उरला नाही आहे. संवैधानिक संस्थांवर आगपाखड करत आहेत. राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई विरोधकांना झाली आहे. ओढाताणीची परिस्थिती असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चालले नाही. याचा अर्थ हा मूळीच नाही आमच्याकडे खूप पैसे आहेत. योजना पूर्ण करायला पैसे आहेत आणि आम्ही ते देत आहोत. केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत. शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे. पावसाची मदत आणि 10 हजार रुपयांची मदत देखील दिली असल्याचे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Warning : 'फडणवीसांच्या इशाऱ्यावर इतर पक्ष चालतात', शिंदेंच्या आमदाराने फोडला बॉम्ब! 2022 चा इतिहास सांगत भाजपला दिला थेट इशारा!

छोटे मोठे 18 विधेयक आम्ही मांडणार आहोत आणि ती सगळी मंजूर व्हावीत, यासाठी आम्ही प्रयत्न करू. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आम्ही समर्पक उत्तर देऊ. उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. अधिवेशनाचा कालावधी खूपच कमी आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. परंतु शनिवार, रविवारीदेखील अधिवेशन होणार आहे. पळून जाण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
BJP Vs Congress : 1 लाख मतांनी जिंकलेल्या भाजप आमदाराकडेही पक्ष प्रवेशासाठी रांगा : काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा दावा

अधिवेशनात आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा करायला तयार आहोत. आम्ही समर्पक उत्तर देऊ. अधिवेशन लहान आहे हा मुद्दा मांडला. आचारसंहितेमुळे पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त कामकाज करायला आम्ही तयार आहोत. पळून जायची मानसिकता आमची नाही, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Sandeep Gaikwad NCP claim : दीपालीच्या मृत्यू प्रकरणातील माजी नगरसेवक गायकवाड कोणाचा? भाजपचा की, राष्ट्रवादीचा?

विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय अध्यक्ष आणि सभापतींच्या हाती आहे. अध्यक्ष आणि सभापती घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आग्रह नाही आणि दुराग्रह देखील नाही. विरोधकांकडे मुद्दे नाहीत आणि ते रेटून नेण्याची मानसिकता देखील नाही. नागपूरचे अधिवेशन रात्री उशिरा चालते, प्रत्येक दिवशी 10 तास कामकाज चालते.

Devendra Fadnavis
BJP Vs Congress : 1 लाख मतांनी जिंकलेल्या भाजप आमदाराकडेही पक्ष प्रवेशासाठी रांगा : काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com