Maharashtra Govt Formation: मोठी बातमी ! महायुतीने केला राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा; एकनाथ शिंदेंनी दिले पत्र

Mahayuti stakes claim to form government in Maharashtra : राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र देण्यात आला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना पत्र देण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस,अजित पवार उपस्थित होते.
Mahayuti Leaders
Mahayuti Leaders Sarakrnama
Published on
Updated on

Mumbai News :राज्यातील भाजप आमदाराची बैठक बुधवारी सकाळी पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर लगेचच बुधवारी दुपारी महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला.

राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेऊन महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र दिले. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना पत्र देण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.

यावेळी प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, उदय सामंत उपस्थित होते. पक्षनिरीक्षक निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, विनोद तावडे, धनंजय मुंडे उपस्थित होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीमधील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही नेत्यांनी भेट घेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा केला.

राज्यपाल यांची भेट घेत महायुतीकडे सत्तास्थापनेसाठी असलेल्या आमदारांच्या संख्याबळाचे पत्र तिन्ही नेत्यांनी दिले. महायुती सरकारचा उद्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होईल. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी होणार आहे.

Mahayuti Leaders
Devendra Fadnavis : मोठी बातमी : भाजपचं ठरलं, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानात शपथविधी होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लगेचच सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच इतर काही मंत्र्यांचाही शपथविधी होणार असेल तर त्याची घोषणा गुरुवारी रात्री करण्यात येणार असल्याचे समजते.

Mahayuti Leaders
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असलेल्या फडणवीसांसमोर 'ही' असणार मोठी आव्हानं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com