Devendra Fadnavis : मोठी बातमी : भाजपचं ठरलं, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

BJP Core Committee Meeting Update : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक थोड्या वेळापूर्वीच पार पडली. या बैठकीत फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होईल. पण त्याआधीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे तेच राज्याचे मुख्यमंत्री असतील.

कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. तर रवींद्र चव्हाण त्याला अनुमोदन देतील. त्यानंतर बहुमताने फडणवीसांचे नाव निश्चित केला जाईल.

Devendra Fadnavis
BJP Maharashtra : विधानसभेत भाजपच्या यशाचं गमक काय? संघटन अन् व्यवस्थापन कौशल्य...

कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, पंकडा मुंडे, अशोक चव्हाण, गिरीश महाजन आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत नेत्यांनी फडणवीसांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. त्यानंतर आता भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. सुरूवातीपासूनच फडणवीस यांच्याच नावाची चर्चा होती.

आमदारांच्या बैठकीतनंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली जाईल. सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी आझाद मैदानात शपथविधी होणार आहे. फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतो. तसेच इतर काही मंत्र्यांचाही शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde : लोकप्रिय मुख्यमंत्री, मोदी शाहांच्या 'गुडबुक'मध्ये अन् 'स्ट्राईक रेट'ही ठाकरेंपेक्षा उजवा..!

अद्याप अधिकृतपणे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री तसेच संभाव्य मंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झाल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्रिपदही मिळावे, यासाठी ते आग्रही होते. त्यामुळेसंभाव्य मंत्रिमंडळाबाबत काय निर्णय होणार, यासाठी गुरूवारी दुपारपर्यंत वाट पाहावी लागू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com